Telangana Assembly Election 2023 eSakal
Election News

Telangana Assembly Election 2023 : महाराष्ट्रातील 14 गावं करतात तेलंगणामध्ये मतदान; काय आहे कारण?

Maharashtra-Telangana Border : तेलंगणा विधानसभेसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं होतं. आता 3 डिसेंबरला याचा निकाल जाहीर होईल.

Sudesh

Telangana Assembly Results : सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू आहे. यामध्ये तेलंगणाचा देखील समावेश आहे. तेलंगणा विधानसभेसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं होतं. आता 3 डिसेंबरला याचा निकाल जाहीर होईल. विशेष म्हणजे, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 14 गावांनी देखील मतदान केलं.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात असणाऱ्या या गावांना खरंतर विशेष अधिकार देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये ते मतदान करू शकतात. या गावांमधील नागरिकांकडे दोन्ही राज्यांमधील मतदान आणि आधार कार्ड आहेत.

जिवती तालुक्यातील मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजला, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मपती, अंतपूर, इंदिरानगर, यसपूर, पलासगुडा, भोलापथर आणि लेंडीगुडा अशी या गावांची नावं आहेत. या गावांना दोन्ही राज्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी दोन्हीकडे मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. (Election News)

या गावांमध्ये दोन्ही राज्यांमधील शाळा आहेत. ग्रामपंचायत एक असल्या, तरी सरपंच वेगवेगळे आहेत. ही सर्व गावं तेलंगणाच्या कोमरभिम आसिफाबाद्या या मतदारसंघात येतात. तेलंगणामध्ये यंदा बीआरएस विरुद्ध काँग्रेस अशी मुख्य लढत असणार आहे. भाजप देखील याठिकाणी आपली शक्ती पणाला लावणार आहे. मात्र, तेलंगणामध्ये कुणाचं सरकार येईल हे आता रविवारीच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT