Use of plastic Sakal Podcast
Explainers | विश्लेषण

plastic use : प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे वंध्यत्व येऊ शकतं, हे माहिती आहे का?

प्लॅस्टिकचा वापर कितीही टाळायचा म्हटला तरी आपण तो करतोच. प्लॅस्टिकचे डबे आणि बाटल्या अनेकांच्या स्वयंपाकघराचा जणू अविभाज्य घटक असतो. मात्र हे डबे आपल्या आरोग्यासाठी किती आणि कसे धोकादायक ठरू शकतात, माहिती आहे का?

स्वाती केतकर-पंडित

प्लॅस्टिक जागतिक तापमानवाढीवर परिणाम करतंय, प्लॅस्टिक पाणी नासवतं आहे, जमीन बिघडवतं आहे, अशा अनेक बातम्या आपण ऐकतो तरीही आपण प्लॅस्टिक वापर काही थांबवत नाही.

खरंतर आता प्लॅस्टिक आपल्या जगण्यात असं काही भिनलं आहे की ते टाळताच येणं अशक्य झालंय.

मात्र प्लॅस्टिकचा वापर करायचा झाला तर ते कशापासून तयार झालं आहे, त्याचाही शोध घ्यावा लागेल.

बीपीएचा धोका

बिस्फेनॉल ए,ज्याला बीपीए असं म्हणूनही ओळखलं जातं. हे रसायन मानवी शरीरासाठी धोकादायक आहे.

युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसच्या मते,

प्लास्टिक अधिक टिकाऊ आणि विघटन प्रतिविरोधी बनावीत यासाठी बीपीएचा वापर केला जातो.

बीपीएचा वापर वर्षानुवर्षे होत आहे. पण त्याचे संभाव्य धोकेसुद्धा बरेच आहेत.

काही संशोधने आणि अभ्यासानुसार मानवी शरीरावर केलेल्या अभ्यासांमध्ये, बीपीएचा वापर आपल्या आरोग्याला हानीकारक ठरू शकतो.

माणसाचे ह्दय, मुलांचे मानसिक स्वास्थ, स्त्रियांचे गर्भाशय आदीसाठी बीपीए मारक ठरतो.

वंध्यत्व, गर्भाची वाढ खुंटणे अथवा अपुरी होणे, हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर तसेच मुलांमध्ये आक्रमकपणा वाढणे याशिवाय महिलांमध्ये पॉलिसिस्टीक ओव्हेरियन सिंड्रोम, एंडोमेट्रिओसिस याचबरोबर ह्दयरोग आदी विकारांमध्ये बीपीए मारक ठरते.

मॅसॅच्युसेट्स एमहर्स्ट विद्यापीठातील पर्यावरणीय आरोग्य विज्ञानाच्या प्राध्यापक लॉरा वॅन्डनबर्ग यांनी एका संशोधनाअंती हे मत व्यक्त केले आहे.

अन्न साठवणुकीसाठीच्या प्लॅस्टिक डब्यांमध्ये बीपीएचा वापर जास्त होतोच पण इतर अनेक ठिकाणी त्याचा वापर होतो. उदा. शटरप्रूफ खिडक्या, पाण्याच्या बाटल्या, चष्मे, रेझिन्सचा मुलामा दिलेले पत्र्याचे डबे, बाटल्यांची झाकणं, पाण्याचे नळ इ.

वॅन्डनबर्ग म्हणतात, तुम्ही जे प्लॅस्टिक विकत घेता, ते केव्हा खरेदी केलं यावर त्याची रचना अवलंबून असू शकते.

कारण टपरवेअरच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार मार्च 2010 पासून, यूएस आणि कॅनडामध्ये विकल्या जाणाऱ्या टपरवेअर उत्पादनांमध्ये बीपीएचा वापर केलेला नाही.

बीपीए धोकादायक का आहे?

बीपीएचा वापर करून तयार केली गेलेली प्लॅस्टिकची उत्पादने पृथ्वीसाठी आणि माणसासाठीही खरोखरच काळजीची गोष्ट आहे.

जेव्हा जेव्हा बीपीएयुक्त प्लॅस्टिकचा वापर होतो तेव्हा तेव्हा या वस्तू थोड्या थोड्या प्रमाणात बीपीए बाहेर टाकत असतात.

ग्राहकांनी वापरून टाकलेलं प्लॅस्टिक, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थ अथवा इतर वस्तूंमधून बाहेर पडणारी बीपीएची पातळी कमी असली तरी काळजीची नक्कीच आहे.

एकेरी वापरातील प्लॅस्टिकमुळे पृथ्वीवर हाहाकार माजत आहे. हे प्लॅस्टिक आपल्यासाठी उपयोगाचं नाहीच पण ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, ते पाहूया.

तज्ज्ञ म्हणतात, "जर तुम्ही विकत घेतलेल्या दिवशी प्लॅस्टिक सुरक्षित नसेल तर 10 वर्षांनंतर ते सुरक्षित नाही,"

खरंतर जितका जास्त काळ तुम्ही ते आपल्या जवळ बाळगाल तितके ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत.

डब्यांची झीज होण्याचा धोका

प्लॅस्टिकच्या खाद्यपदार्थांचे डबे डिशवॉशरमध्ये धुवून किंवा खरमरीत ब्रशने घासल्यावर त्यावर ओरखडे उमटतात.

या ओरखड्यांमुळे त्यावर जंतू राहण्यासाठी खोल खोबणी तयार होते. शिवाय प्लॅस्टिकमधील हानीकारक घटक बाहेर टाकण्याची त्यांची क्षमता यामुळे वाढते.

अन्न सुरक्षा संशोधन आणि ग्राहक अहवालांचे परीक्षण करणाऱ्या, चाचणी करणाऱ्या आणि त्यानंतर ग्राहकांना सल्ला देणाऱ्या एका एनजीओतील संचालक जेम्स रॉजर्स यांनी सांगितलं.

काही प्लास्टिकच्या डब्यांवर "मायक्रोवेव्ह सेफ" असे लिहीलेले असते. मात्र मायक्रोवेव्ह सुरक्षित असले तरी आरोग्यासाठी ते सुरक्षित नसतात.

काही प्लॅस्टिक डब्यांतून अन्न गरम करताना त्यातून शरीराला नकोशी अशी रसायने बाहेर पडतात आणि अन्नाद्वारे ती आपल्या पोटात जातात.

त्यामुळे अन्न गरम करायचं असेल तर ते काचेच्या भांड्यात काढून मगच गरम करावं, असं संशोधक सांगतात.

बरेचदा वापरुन वापरुन डब्यांचा रंग उडतो.

याचा अर्थ की त्या प्लॅस्टिकमध्ये रासायनिक बदल झाले आहेत.

त्यामुळे अशाप्रकारचे कोणतेही जुने, अधिक वापरलेले आणि खराब झालेले प्लॅस्टिकचे डबे टाकून द्यायला हवेत.

plastic garbage

बीपीए आणि इस्ट्रोजेन

यूएस इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसच्या म्हणण्यानुसार, बीपीएचा मानवी शरीराशी संपर्क बहुतांश दैनंदिन आहाराद्वारे होतो.

बीपीए शरीराला का हानीकारक आहे, याबद्दल 1930 च्या दशकात चाचण्या केल्या गेल्या होत्या.

त्यातून हे स्पष्ट झालं की, बीपीए शरीरात इस्ट्रोजेनसारखे कार्य करते.

इस्ट्रोजेन हे एक अतिशय शक्तिशाली संप्रेरक आहे. पुनरुत्पादन आणि प्रजननासाठी ते महत्त्वाचे आहे.

लैंगिक अवयवांच्या, मेंदूच्या विकासासाठी आणि चयापचय नियंत्रित करण्यासाठी बीपीए अत्यंत महत्त्वाचे आहे.

स्नायू आणि चरबीवरही इस्ट्रोजेन पातळीचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील या संप्रेरकाच्या पातळीत बदल झाल्यास गडबड होते.

बीपीएमधील रेणूंच्या आकारामुळे ते इस्ट्रोजनवर परिणाम करण्याची शक्यता जास्त असते.

BPA मधील रेणूंच्या आकारामुळे ते इस्ट्रोजेनशी बांधले जाण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे पुन्हा पुन्हा वापरता येण्याजोग्या प्लॅस्टिकमध्ये बीपीएचे प्रमाण जास्त असू शकते.

काय कराल?

अन्न साठवणुकीसाठी अथवा गरम करण्यासाठी प्लॅस्टिकऐवजी स्टील, काच आणि पोर्सेलिन किंवा सिरॅमिकचा वापर करावा, विशेषत: गरम पदार्थ, द्रव पदार्थांसाठी तर नक्कीच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT