फॅमिली डॉक्टर

ऍसिडिटी

डॉ. स्वरूप लडकत

ऍसिडिटी अथवा आम्लपित्त ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. बऱ्याच माणसांना कधी ना कधी याचा अनुभव येतोच. पण काही जणांना ऍसिडिटीचा नेहमी त्रास होतो. आम्लपित्त अथवा ऍसिडिटी म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. हे आम्ल अन्न पचनासाठी अत्यंत आवश्‍यक असते. परंतु, त्याच्या अति जास्त प्रमाणामुळे आम्लपित्त अथवा ऍसिडिटीचा त्रास सुरू होऊ शकतो.
सतत जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाणे. तेलकट पदार्थ खाणे. अनियमित जेवणाच्या सवयी, जेवण्याच्या अनियमित वेळा, जागरण, मानसिक ताण -तणाव, सततची काळजी व चिंता, सततची घाई, गडबड या कारणांमुळे ऍसिडिटी होऊ शकते. तसेच धूम्रपान, मद्यपान, तंबाखू सेवन यामुळेसुद्धा ऍसिडिटी होऊ शकते. काही औषधांमुळेसुद्धा ऍसिडिटी वाढू शकते, उदा. अन्टिबायोटीक, एस्पिरीन, सांधेदुखीची औषधे, वेदनाशामक (पेन किलर) औषधे. सध्याच्या धकाधकीच्या काळामध्ये आपले जीवनमान खूप बदललेले आहे. नवनवीन शोधांमुळे कामाचे, खाण्याच्या आवडींचे, पेय पदार्थ या सर्वांमध्ये फार बदल झाला आहे. तसेच व्यवसाय, धंदा, नोकरी यामुळे कामाच्या स्वरूपातही बदल झाला आहे. आपल्या पोटात औषधी, खाद्य पदार्थांमधली भेसळ, प्रदूषण यामुळे शरीरात अपायकारक अशी अनेक कृत्रिम रसायने जातात. निसर्ग नियमाप्रमाणे झोपणे व उठणे यातही बदल झाला आहे. या सर्व बाबींचा शरीरावर कमी-अधिक परिणाम होऊन आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो.


ऍसिडिटीची प्रामुख्याने पुढील लक्षणे दिसून येतात. छातीत जळजळ होणे, पोटात तसेच घशात जळजळ होणे, अंग जड पडणे, वारंवार आंबट कडू पाणी तोंडात येणे, नेहमी नेहमी तोंड येणे, मळमळणे, डोके दुखणे, आणि आंबट, पिवळसर, उलटी झाल्यानंतर डोकेदुखी कमी होणे. अस्वस्थ वाटणे, करपट ढेकर येणे. हातापायाच्या तळव्यांची आग होणे, डोळे लाल होणे, जळजळ होणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, चक्कर येणे, अंगावर तांबूस रंगाचे फोड किंवा गांध्या येणे, अंगाला खाज सुटणे.


ऍसिडिटीवर वेळीच उपचार झाले नाहीत, तर पुढे त्याचे दुष्परिणाम गंभीर होऊ शकतात. उदा. पोटात अल्सर होणे, पित्ताशयात खडे होणे, यकृताशी संबंधित काही गंभीर आजार होऊ शकतात.


प्रतिबंधात्मक उपायांमध्ये आपण आपली दिनचर्या नियमित ठेवली, तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आपला स्वभाव रागीट अथवा खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे. व्यसनांपासून सदैव दूर राहावे. तसेच फास्ट फूड, कोल्डड्रिंक याचे सेवन टाळावे.


होमिओपॅथी या उपचार पद्धतीमध्ये आम्लपित्तासाठी अनेक उपयुक्त औषधे उपलब्ध आहेत. या उपचार पद्धतीमध्ये आम्लपित्ताची अचूक कारणे शोधून तसेच रोग्याची अचूक लक्षणे शोधून त्यावर औषध उपचार करता येतो. जेणेकरून ज्या कारणामुळे आम्लपित्त होते, त्या कारणाप्रती रोग्याची प्रतिकार शक्ती वाढते. आणि आम्लपित्ताचा त्रास समूळ नष्ट होण्यास मदत होते. होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या लक्षणांसाठी वेगवेगळी औषधे उपलब्ध आहेत. काही औषधांची माहिती पुढीलप्रमाणे-
नक्‍स वोमिका- जागरण, मसालेदार, तेलकट खाण्यामुळे होणारे आम्लपित्त. अर्सेनिक अल्बम- घशात, पोटात होणाऱ्या जळजळीसाठी उपयुक्त. न्याट्रम मूर- सततचा ताण, तणाव, काळजी, उदासीनता यामुळे होणारे आम्लपित्त.


कार्बो वेज - अति मांसाहार, पचनास जड असे पदार्थ खाण्याने होणारे आम्लपित्त.
झिन्कम मेट - अति घाई, गडबडीत जेवणाने होणारे आम्लपित्त. याचबरोबर कॅल्कारिया कार्ब, पल्सेटीला, फेरम फोस, लायकोपोडियम, सल्फर, चेलिडोणीयम इत्यादी अनेक गुणकारी औषधे होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहेत ज्याचा रुग्णांना फायदा होऊ शकतो.



 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT