Sickness Sakal
फॅमिली डॉक्टर

प्रश्नोत्तरे

माझे वय ३० वर्षे आहे. आमच्या घरात सोरायसिसची वंशपरंपरा आहे. आजोबांना उतारवयात पण खूप कमी प्रमाणात होता.

सकाळ वृत्तसेवा

माझे वय ३० वर्षे आहे. आमच्या घरात सोरायसिसची वंशपरंपरा आहे. आजोबांना उतारवयात पण खूप कमी प्रमाणात होता.

माझे वय ३० वर्षे आहे. आमच्या घरात सोरायसिसची वंशपरंपरा आहे. आजोबांना उतारवयात पण खूप कमी प्रमाणात होता. आई-बाबा दोघांनाही त्यांच्या चाळिशीच्या आसपास पण कोपरावर थोड्या प्रमाणात सुरू झाला. मला मात्र मी १४ वर्षांचा असल्यापासून आणि संपूर्ण अंगावर हा त्रास आहे. स्टिरॉइड वगैरे घेतल्याने पूर्ण बरा होतो पण नंतर पुन्हा सुरू होतो. कृपया यावर काही उपाय असल्यास सुचवावा..

- परेश काळे

उत्तर - या प्रकारच्या त्रासावर रक्तशुद्धीसाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करणे आवश्यक असते. यात पथ्य सांभाळणे, रक्तशुद्धीकर औषधे घेणे, पंचकर्माच्या मदतीने शरीरशुद्धी करणे महत्त्वाचे असते. या दृष्टीने मांसाहार, आंबट पदार्थ, तळलेले पदार्थ, मैदा, सिमला मिरची, वांगे, गवार, कोबी-फ्लॉवर, टोमॅटो, चिंच, काजू, पिस्ता, दही हे पदार्थ आहारातून टाळणे आवश्यक. रक्तशुद्धीसाठी महामंजिष्ठादी काढा, अनंतसॅन गोळ्या, पंचतिक्त घृत घेण्याचा उपयोग होईल. स्नानाच्या वेळी साबणाऐवजी सॅन मसाज पावडर व मसुराचे पीठ यापासून तयार केलेले मिश्रण वापरणे, केसांसाठी रासायनिक द्रव्यांसून बनविलेली उप्तादने न वापरता रिठा, शिकेकेई, आवळकाठी वगैरे नैसर्गिक द्रव्यांपासून बनवलेले मिश्रण किंवा तयार संतुलन सुकेशा वापरणे हे चांगले. वैद्यांच्या सल्ल्याने विरेचन, बस्तीसारखे उपचार घेणेही उत्तम.

आम्ही फॅमिली डॉक्टर सुरुवातीपासून वाचतो. यातील उपायांचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे. माझा प्रश्र्न असा आहे की गूळ व साखर हे उसाच्या रसापासून बनविलेले आहेत तर साखरेऐवजी गूळ वापरलेला चालतो का?

- सीमा पाटील

उत्तर - फॅमिली डॉक्टरचा उपयोग झाल्याचे कळविल्याबद्दल धन्यवाद. गूळ व साखर दोन्ही जरी उसापासून बनविलेले असले तरी त्यांच्या गुणांतील फरक प्रक्रियेमुळे आलेला असतो. गूळ उष्ण वीर्याचा असतो तर साखर शीत वीर्याची असते. यामुळे थंडीमधे कच्चा गूळ तूप घालून योग्य प्रमाणात खाल्लेला चालतो. मात्र खडीसाखर वर्षभर चहा-दूध, शिरा, खीर वगैरे गोड पदार्थ बनविण्यासाठी वापरलेली चालते. प्रत्येकाने किमान २-३ चमचे प्रमाणात खडीसाखर सेवन करणे आवश्यक होय. मधुमेह असणाऱ्यांसाठी हे प्रमाण थोडे कमी म्हणजे एक ते दीड चमचा इतके करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तानचं हे अती झालं! म्हणतात 'हंस्तादोलन' प्रकरणावर कारवाई करा अन्यथा UAE च्या लढतीवर बहिष्कार टाकतो...

Latest Marathi News Updates : आष्टीत पुरामुळे इमारतीवर अडकलेल्या साप्ते कुटुंबाचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू

खूपच इमोशनल... प्रेक्षकांना कसा वाटला 'लपंडाव' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात- रुपालीऐवजी दुसरी कुणी...

Crime: अनैसर्गिक कृत्य! २ तरुणांच्या गुप्तांगावर २३ वेळा स्टेपल अन् मिरचीचा स्प्रे...; जोडप्याचा कारनामा, भयंकर कारण समोर

Crime News : नाशिकमधील बेकायदा कॉल सेंटरवर सीबीआयची धाड; यूकेतील नागरिकांना गंडा

SCROLL FOR NEXT