Acidity Sakal
फॅमिली डॉक्टर

प्रश्नोत्तरे

मला गेले काही दिवस पित्ताचा व अपचनाचा तसेच करपट ढेकर येण्याचा त्रास होत आहे. तपासण्या केल्या असता पित्ताशयात खडे असल्याचे आढळले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मला गेले काही दिवस पित्ताचा व अपचनाचा तसेच करपट ढेकर येण्याचा त्रास होत आहे. तपासण्या केल्या असता पित्ताशयात खडे असल्याचे आढळले आहे.

प्रश्र्न १ - मला गेले काही दिवस पित्ताचा व अपचनाचा तसेच करपट ढेकर येण्याचा त्रास होत आहे. तपासण्या केल्या असता पित्ताशयात खडे असल्याचे आढळले आहे. संतुलनच्या पित्तशांती गोळ्या व स्पेशल गुलकंद सुरू केल्यावर त्रास कमी झालेला आहे. पण शस्त्रक्रिया करून पित्ताशय काढून टाकावे असा डॉक्टरांचा सल्ला आहे. तरी काय करावे याबद्दल सल्ला दिल्यास उत्तम होईल.

- सविता भागवत, पुणे

उत्तर - शरीरात पित्ताचे दोष वाढले असल्यास काही लोकांमध्ये अशा प्रकारे पित्ताशयात खडे होण्याची प्रवृत्ती दिसते. पित्तदोष शांत होण्याच्या दृष्टीने संतुलनच्या पित्तशांती गोळ्या तसेच संतुलनचा स्पेशल गुलकंद घेतल्याचा तुम्हाला फायदा झालेला दिसतो आहे. संतुलनचे अविपत्तिकर चूर्ण वा सॅनकूल चूर्ण नियमितपणे घेण्याचा उपयोग होईल. संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारख्या तेल पोटावर हलक्या हाताने जिरविण्याचा उपयोग होऊ शकेल. शरीरात पित्त जास्त प्रमाणात वाढणार नाही यासाठी आपल्या आहार-विहाराची काळजी घेणे इष्ट असते. शक्यतो आहारात खूप प्रमाणात कडधान्ये, आंबवलेले पदार्थ, आंबट पदार्थ तसेच अति तिखट पदार्थ घेणे टाळावे. हॉटेलमधील खाणे, तयार खाद्यपदार्थ व तयार पेये टाळणेच बरे. अशा केसेसमध्ये संतुलन पंचकर्म करण्याचाही उपयोग होताना दिसतो. त्यामुळे शक्य असल्यास शास्त्रोक्त पद्धतीने शरीरशुद्धी करून घेण्याचाही फायदा होऊ शकेल. पित्ताशय आपल्या पचनसंस्थेसाठी अत्यंत गरजेचे असते. शस्त्रक्रिया करून पित्ताशय काढून टाकल्यानंतर पोटात जळजळ होण्याचा व अपचनाचा त्रास होताना दिसतो. त्यामुळे अशा प्रकारची शस्त्रक्रिया शक्यतो टाळलेलीच बरी. पण कधीतरी खडे फार मोठे असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. त्याच्याकरता वैद्यांचा सल्ला घेतलेला बरा.

प्रश्र्न २ - मला अपचन, ॲसिडिटी वगैरे कुठलाही त्रास नाही. झोपही शांत येते. दिवसभर दिनचर्येचे व्यवस्थित पालन होते, पण आठवड्यातून बऱ्याचदा शौचाला सुरुवातीला कडक होते, त्यामुळे सुरुवातीला मलत्यागाच्या वेळी दुखते. इतर कुठलाही त्रास होत नाही. नंतर मलप्रवृत्ती व्यवस्थित असते. याचे कारण काय असेल व यावर काही औषधोपचार करता येणे शक्य आहे का व औषधे घेण्याची गरज आहे का?

- प्रमिला तापकीर, नागपूर

उत्तर - अन्नपचन होत असताना मोठ्या आतड्यात आल्यानंतर त्यातील सगळा द्रवभाग गरजेपुरता शोषला जातो. शरीरात कोरडेपणा जास्त असला, मुख्यतः आतड्यांमध्ये कोरडेपणा जास्त असला तर अशा प्रकारे मल खड्यासरखा होण्याची शक्यता असते. यासाठी रोज नियमाने व्यवस्थित प्रमाणात पाणी पिणे, तहान लागली असता त्याकडे दुर्लक्ष न करणे, शक्य झाल्यास दिवसातून २-३ वेळा कोमट पाणी घेण्याचा उपयोग होईल. जलसंतुलन घालून उकळलेले पाणी कोमट असताना पिण्याचा अधिक उपयोग होऊ शकेल. जेवणातही दर २-३ घासांनंतर एक घोट पाणी पिणे उत्तम. जेवणात सूप, आमटी वगैरे द्रवपदार्थांचा समावेश असावा व शक्य झाल्यास पोळी, भाकरी, भात या द्रवपदार्थांत मिसळूनच खावे. रात्री अर्धा कप गरम पाण्यात दोन चमचे साजूक तूप व चिमूटभर सैंधव मीठ मिसळून घेतलेले चांगले. आहारात तुपाचे प्रमाण वाढवण्याचाही फायदा होऊ शकेल. रात्री झोपताना सॅनकूल चूर्णासारखे एखादे चूर्ण किंवा संतुलन अविपत्तिकर चूर्ण घेण्याचाही फायदा होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maruti Cars: जीएसटी कमी झाल्यानंतर अल्टो, स्विफ्ट, डिझायर आणि वॅगनआरची किंमत किती असेल?

Prithvi Shaw : IPL 2026 मध्ये पृथ्वी शॉ CSK च्या ताफ्यात? ऋतुराज गायकवाडची मध्यस्थी? फ्रँचायझीने पोस्ट केला Video

न्यायालये ताकदवान नाहीत, हात बांधलेत असं आम्ही म्हणू का? सरन्यायाधीशांचा सरकारला सवाल

Diabetes in Kids: तुमच्या मुलांना डायबिटीजचा धोका आहे का? 'ही' ८ लक्षणे वेळेत ओळखून घ्या योग्य काळजी

Shivaji Maharaj: पुण्यातील मानाचा पहिला गणपती अन् शिवरायांचं बंधन! ; मावळे मोहिमेवर जाण्याआधी घेत असत बाप्पाचं दर्शन

SCROLL FOR NEXT