beauty tips for face esakal
फॅमिली डॉक्टर

Beauty Tips For Face: दिवसेंदिवस चेहरा काळवंडतोय? तज्ज्ञ सांगतात उपाय...

माझी मुलगी १५ वर्षांची आहे. ती लहान होती तेव्हा बरीच गोरी होती. सध्या तिचा रंग खूप काळवंडलेला दिसतो, तसेच कानात किंवा गळ्यात काहीही आर्टिफिशियल घातले की त्या ठिकाणी पुरळ उठते, खाज येते.

सकाळ वृत्तसेवा

Beauty Tips For Face: माझी मुलगी १५ वर्षांची आहे. ती लहान होती तेव्हा बरीच गोरी होती. सध्या तिचा रंग खूप काळवंडलेला दिसतो, तसेच कानात किंवा गळ्यात काहीही आर्टिफिशियल घातले की त्या ठिकाणी पुरळ उठते, खाज येते.

माझी मुलगी १५ वर्षांची आहे. ती लहान होती तेव्हा बरीच गोरी होती. सध्या तिचा रंग खूप काळवंडलेला दिसतो, तसेच कानात किंवा गळ्यात काहीही आर्टिफिशियल घातले की त्या ठिकाणी पुरळ उठते, खाज येते. कृपया यावर काही उपाय सुचवावा.

- सरिता नाखवा

उत्तर - ही सर्व लक्षणे रक्तामध्ये अशुद्धी असल्याची आहेत. मुलीला संतुलन शतानंत कल्प घालून देण्याचा उपयोग होईल. सकाळ-संध्याकाळ पित्तशांती गोळ्या तसेच महामंजिष्ठादी काढा घेण्याचाही उपयोग होईल.

पंचतिक्त घृत हे रक्त शुद्ध करून त्वचा उजळण्यासाठी उत्तम असते. रोज सकाळी एक चमचा हे घृत घेण्यानेही हा त्रास कमी होईल.

गवार, ढोबळी मिरची, वांगे, कोबी, फ्लॉवर, दही, तळलेले पदार्थ, बेकरीतील पदार्थ आहारातून वर्ज्य करण्याचाही फायदा होईल. स्नानाच्या वेळी साबणाऐवजी सॅन मसाज पावडर आणि मसूर पीठ यांचे समभाग मिश्रण वापरणेही उत्तम.

आम्ही सर्व जण गेल्या दोन महिन्यांपासून रोज सकाळी संतुलन च्यवनप्राश घेतो. माझा मुलगा पाच वर्षांचा आहे. तोसुद्धा च्यवनप्राश अगदी आवडीने घेतो. मला विचारायचे आहे की, च्यवनप्राश वर्षभर घेतला तर चालतो का? का फक्त हिवाळ्यातच घ्यायचा असतो? च्यवनप्राश घेण्यास सुरुवात केल्यापासून आम्हा सर्वांना अधिक तरतरीत आणि उत्साही वाटते आहे, तसेच मुलाला बुद्धिवर्धनासाठी काय देता येईल, हेसुद्धा सांगावे.

- अभय दवणे

उत्तर - च्यवनप्राश हे रसायन संपूर्ण वर्षभर घेता येईल असे असते. संतुलनमध्ये च्यवनप्राश बनविताना ते खूप काळजीपूर्वक म्हणजे उत्तम प्रतीच्या घटकद्रव्यांपासून ते सर्व संस्कार करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया पाठानुसार केलेल्या असतात.

त्यामुळे नियमित च्यवनप्राश घेण्याचा गुण निश्र्चित येतो. तुमच्या अनुभवाप्रमाणे लहान मुलेही संतुलनचा च्यवनप्राश आवडीने घेतात. मुलाला च्यवनप्राश द्यावाच, त्याव्यतिरिक्त चैतन्य कल्प घालून दूध, पंचामृतामध्ये अर्धा चमचा अमृतशर्करा तसेच ब्रह्मलीन सिरप देण्याचाही उपयोग होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT