फूड

Health News : हृदयाच्या आरोग्यासाठी ओव्याचा चहा फायदेशीर, पाहा कसा ते..

ओव्यामुळे पोटदुखी, गॅस, उलट्या, आंबट ढेकर आणि ऍसिडिटीपासून आराम मिळतो.

सकाळ डिजिटल टीम

ओव्यामुळे पोटदुखी, गॅस, उलट्या, आंबट ढेकर आणि ऍसिडिटीपासून आराम मिळतो.

ओवा हा चवीने कडू आणि थोडा तिखट असतो. अनेक आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी ओव्याचा वापर होतो. चवीला कडवट असल्याने तो अनेकांना आवडत नाही. मात्र ओवा हा पोटाच्या काही आजारांवर रामबाण उपाय म्हणून वापरला जातो. ओव्यामुळे पोटदुखी, गॅस, उलट्या, आंबट ढेकर आणि ऍसिडिटीपासून आराम मिळतो. लहान बाळ रडत असले की त्यांच्या तोंडात ओवा फुंकला जातो. यामुळे जर त्याच्या पोटात कळ होत असेल तर ती कमी होईल अशा उद्देश असतो.

ओव्यामध्ये प्रथिने, चरबी, खनिजे, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. याशिवाय सेलरीमध्ये कॅल्शियम, थायमिन, रिबोफ्लेविन, फॉस्फरस, लोह आणि नियासिनही चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे ओव्याच्या चहाचे सेवन केल्यास शरीर बऱ्याच आरोग्याच्या समस्येंपासून दूर राहते.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्ही लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही ओव्याचा चहा घेऊ शकता. ओव्याच्या चहात फायबरचे प्रमाण अधिक असते. तो फायबरचा उत्तम स्रोत मानला जातो. फायबरमुळे शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते.

हृदय निरोगी ठेवते

ओव्याचा चहा हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपोयगी पडते. या चहामध्ये ओमेगा तीन फॅटी अॅसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात. आणि हे घटक हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

पचनशक्ती मजबूत राहते

ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी ओव्याचे सेवन करावे. यामध्ये आढळणारे तेल पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे या चहाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुदढ राहते.

दम्याच्या रुग्णांना फायदेशीर

ओव्याच्या चहातून येणाऱ्या धूराचा श्वास घेतल्यास नाकातील मार्ग साफ होतात. मधाचे काही थेंब टाकून ओव्याचा चहा बनवून तो गरम करून प्यायल्याने दम्याचा त्रास कमी होतो.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त

जर तुम्ही वाढलेल्या कोलेरेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त असाल तर हा चहा घ्या. अजवाईन चहा प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्स न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? वैभव सूर्यवंशीचे स्वप्न अपूर्ण राहणार... नेमकी भानगड काय?

Indigo-Air India: विमान प्रवास महागण्याची शक्यता! एअर इंडिया-इंडिगोची उड्डाण कपात; कारण काय? प्रवाशांना मोठा फटका

"त्यावेळी फॅनने स्वतःचा जीव घेण्यापासून रोखलं" प्रवीण तरडेंनी सांगितली स्ट्रगलची भयंकर आठवण

Cabinet Decision: फ्री रेशन योजनेत ३ मोठे बदल! ८० कोटी रेशनधारकांवर थेट परिणाम होणार; केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

आणि श्रुती मराठेने लगेच छत्री बंद केली... कलाकारांच्या नखऱ्यांबद्दल विचारताच प्रवीण तरडेंनी सांगितला तो किस्सा

SCROLL FOR NEXT