Akhad Special Recipe esakal
फूड

Akhad Special Recipe : कुरकुरीत मस्त अशी रवा सुरमई फ्राय खाऊन आषाढचा शेवटचा रविवार सेलिब्रेट करा

संडे स्पेशल एक खास आणि हटके रेसिपी जाणून घेऊयात. या रेसिपीचं नाव आहे रवा सुरमई फ्राय.

साक्षी राऊत

Akhad Special Recipe : आषाढचा आज शेवटचा रविवार असून अनेकांचा यावेळी मटण चिकन बनवण्याचा बेत ठरला असेल. चला तर मग यानिमित्ताने संडे स्पेशल एक खास आणि हटके रेसिपी जाणून घेऊयात. या रेसिपीचं नाव आहे रवा सुरमई फ्राय.

सुरमई फ्रायसाठी लागणारे साहित्य

सुरमई दीड पाव - अर्धा इंचाचे काप

आता सुरमई कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून कोरड्या करून घ्या. जेणेकरून त्याचं मॉइश्चर कमीत कमी राहील.

मॅरिनेशनसाठी आलं लसूण पेस्ट १ चमचा

हळद अर्धा चमचा, लिंबाच रस आणि मीठ

मसाला बनवण्यासाठी लाल तिखट - एक चमचा, धणे पुड एक चमचा, गरम मसाला १ चमचा आणि कोथिंबीर

वरच्या कोटिंगसाठी जाड रवा आणि रवा कच्चा हवा.

आणि एक चमचा तांदळाचं पीठ

सुरमई फ्राय बनवण्याची रेसिपी

  • फिश मॅरिनेट करण्यासाठी आधी एका बाऊलमध्ये सुरमाइ घ्या . त्यात आल्या लसणाची पेस्ट घाला. हळद घाला. मीठ घाला आणि लिंबाचा रस घाला.

  • आता व्यवस्थित सगळ्या सुरमईला चोळून घ्या. १५-२० मिनीट आता मॅरिनेशनसाठी ठेवा.

  • आता एक पसरट बाऊल घ्या. सुरमईच्या आऊटर कोटिंगसाठी जाड रवा घ्या. त्यात एक कप तांदळाचं पीठ मिसळा. मीठ घाला आणि त्यात थोडं चवीपुरतं लाल तिखट घाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. (Recipe)

आता मसाला तयार करा

  • मसाल्यासाठी एक दीड चमचा लाल तिखट घ्या, धणे पुड, जिरे पुड, मीठ घाला आणि आता हा ड्राय मसाला मिक्स करून घ्या आणि त्यानंतर त्यात ३-४ चमचे पाणी घाला. त्यात आता कोथिंबीर घाला. (Food)

  • आता मॅरिनेट केलेल्या सुरमईवर मसाला सगळ्या बाजूने चोळून घ्या.

  • आता रव्याच्या तयार केलेल्या मिश्रणात सुरमई घोळवून घ्या.

  • सुरमई तळण्यासाठी आधी तेल हाय फ्लेमवर गरम करा. सुरमई तेलात सोडताना फ्लेम कमी करून घ्या. आता साधारण ३-४ मिनीट तुम्ही सुरमई एका बाजूने तळून घ्या. नंतर तेवढ्याच वेळ दुसऱ्या बाजून तळून घ्या.

  • तुमची कुरकुरीत आणि चटपटीत रवा सुरमई फ्राय डिश तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT