Akshaya Tritiya 2023 esakal
फूड

Akshaya Tritiya 2023 : मालपुआ, दुधी हलवा अन् बरंच काही...,या पदार्थांनी अक्षय तृतीयेचा गोडवा अधिकच वाढेल!

तिन्ही पदार्ख कॉमन असले तरी ते स्पेशल ओकेजनलाच बनवले जातात

Pooja Karande-Kadam

 Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मियांमध्ये एक शुभ सण मानला जातो. यंदा अक्षय्य तृतीया 14 मे रोजी साजरी केली जात आहे. अक्षय्य तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. याशिवाय कपडे, दागिने, जमीन आदींची खरेदी केली जाते.

या दिवशी पूजा विधी करण्याव्यतिरिक्त अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. काही ठिकाणी पुरणपोळी, तर काही ठिकाणी आमरस पुरीचा बेत असतो. तर काही ठिकाणी श्रीखंड पुरी देखील असते. आजच्या दिवशी काहीतरी गोड बणवून नव्या वर्षाला सामोरे जाणे हाच उद्देश असतो.

आपणही काही गोड रेसिपीज पाहुयात. मालपुआ, दुधी आणि बेसनचा हलवा पाहणार आहोत. हे तिन्ही पदार्ख कॉमन असले तरी ते स्पेशल ओकेजनलाच बनवले जातात. हे पदार्थ देवाला अर्पण केले जातात. चला तर मग जाणून घेऊया या दिवशी तुम्ही कोणते पदार्थ बनवू शकता.

 मालपुआ

  • अक्षय्य तृतीयेच्या सणाला मालपुआ किंवा गुजिया खूप प्रसिद्ध आहे.ते बनवण्यासाठी प्रथम दुधात साखर टाकून तासभर ठेवा.

  • त्यानंतर एक वाटी रवा,गव्हाचे पीठ,साखर,बदाम पावडर,वेलची,नारळ मिक्स करा.

  • दुधात साखर चांगली मिसळली की ती मिश्रणात घाला. आपण थोडे पाणी देखील वापरू शकता.

  • सर्वकाही व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करा. यानंतर एका कढईत थोडं तूप गरम करा आणि त्यात पीठ पुरीच्या आकारात पसरवा.

  • दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा. असा मालपुआ तयार होईल. आता तुम्ही गरमागरम सर्व्ह करू शकता

दुधी हलवा

  • अक्षय्य तृतीयेला ही सर्वात जास्त आवडलेली मिठाई आहे.

  • ते बनवण्यासाठी सर्वप्रथम एक लहान दुधी सोलून किसून घ्यावा.

  • नंतर कढईत तूप गरम करा. त्यात किसलेली दुधी परतून घ्या.

  • त्यानंतर त्यात एक मोठा कप दूध घालावे. दूध कोरडे होईपर्यंत शिजवावे.

  • आता त्यात साखर, काजू आणि बदाम घालून ५ ते १० मिनिटे शिजवावे.

  • त्यानंतर वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालून गॅस बंद करावा.

  • ते तसे तयार होईल. स्वादिष्ट दुधीचा हलवा तयार

बेसनाचा हलवा

  • हे एक पारंपारिक आणि समृद्ध पक्वान्न आहे.बेसन हलवा भारतातील विविध राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. जे उत्सव, पूजा आणि सणांसाठी बनवले जाते.

  • तुम्हाला बेसन, तूप किंवा तेल, वेलची पूड, साखर, काजू आणि बदाम, 2 वाट्या दूध, एक कप पाणी लागेल.

  • एका कढईत तूप गरम करून त्यात बेसन घाला.

  • सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. नंतर साखर शुगर घालून शिजवा.

  • साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात दूध आणि पाणी घाला. ते सतत ढवळत राहा.

  • दूध आणि पाणी शोषून होईपर्यंत शिजवा. हलव्यासारखे घट्ट झाले की गॅस बंद करा. त्यात वेलची पावडर आणि ड्रायफ्रुट्स घाला. तुम्ही गरमागरम बेसन हलवा सर्व्ह करू शकता.

बेसन हलवा भारतातील विविध राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपोषणस्थळी भेटायला वेळ नाही, उपोषणकर्त्याला घरी बोलावून पाजला ज्यूस, शिंदेंच्या मंत्र्यांची असंवेदनशीलता

शाहिद आफ्रिदीने 'लायकी' दाखवली! अफगाणिस्तानला उपकाराची आठवण करून दिली ; म्हणतो, आम्ही तुम्हाला पोसतोय...

Sajjangad Torch Festival: सज्जनगड उजळला भक्तीच्या तेजात! 'दिवाळीच्या पहाटे हजारो मशालींनी गड प्रकाशमय'; इतिहास अन् शौर्याचा अनोखा संगम

CM Chief Minister Fadnavis : ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र: मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस : २७ टक्के आरक्षणानुसारच निवडणूका होतील

Stock Market Today: दिवाळीत शेअर बाजारात जोरदार वाढ; निफ्टी-सेन्सेक्स तेजीत, बँक निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक

SCROLL FOR NEXT