Turmeric milk 
फूड

Turmeric milk : हळद दूध बनवायचं योग्य पद्धत माहितीये का?

सकाळ डिजिटल टीम

चिमुटभर हळद कोमट दुधात टाकून प्यायल्यास आरोग्यास अत्यंत लाभदायी ठरते पण तुम्ही योग्य पध्दतीने ते पित आहात का? हळद दूध हे वर्षोनुवर्षे जुने औषध आहे, जे वेदना कमी करणे, झोप वाढविणे, तुमच्या जखमा बरे करणे आणि तुमच्या स्नायुना आराम मिळतो पण तुम्हाला माहितीये का हळद दुधामध्ये काही पदार्थ टाकल्यास मुळव्याधाचा त्रास कमी होतो आणि आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते. तुम्हाला आम्ही योग्य पध्दतीने हळद दूध कसे तयार करावे हे सांगणार आहे जे तुम्हाला वात आणि मुळव्याधाच्या त्रासापासून मुक्त करू शकते.

हळद दूध बनविण्याची योग्य पध्दत काय? ​What is the right way of making Haldi Doodh?

कोमट दुधात चिमूटभर हळदी घालणे ही सामान्य गोष्ट आहे, पण हा योग्य मार्ग आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हळदी दूध पिण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कढईत थोडे तूप टाकणे. तूप किंचित गरम झाल्यावर त्यात हळद आणि त्यानंतर जायफळ आणि मिरपूड आणि साखर (ऐच्छिक) घाला. या मसाल्याच्या मिश्रणाला काही वेळ उकळू द्या, नंतर कोमट दुधात घाला, चांगले मिसळा.

आरोग्य तज्ञ, मुनमुन गनेरीवाला यांच्या म्हणण्यानुसार, या पद्धतीचा अवलंब केल्याने हे सोनेरी दूध बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सर्व घटकांचा चांगला एकत्रीकरण होण्यास मदत होईल. हळदीतील अँटी-कार्सिनोजेनिक आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे हे पेय रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि चयापचय सुधारण्यासाठी उत्तम मिश्रण बनवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तुम्ही हळदी दूध कसे बनवू शकता? How can you make turmeric milk to relieve constipation?

काळी मिरी, जायफळ, दालचिनी यांसारख्या मसाल्यांचा तुपासह समावेश करणे जे नैसर्गिक लॅक्सेटिव्ह म्हणून काम करते ते आतड्यांसंबंधी हालचाल सुलभ करण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते.

अलीकडेच, आरोग्य तज्ञ आणि आहारतज्ञ, लवलीन कौर यांनी एक क्लासिक दूध तडका रेसिपी शेअर केली आहे, वात कमी करण्ये आणि बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करते. "तुपाच्यामध्ये हळद वापरल्यास एंझाइम सक्रिय होतात, आणि हळदीतील कर्क्यूमिन काळी मिरी ज्यामध्ये पाइपरिन असते त्यामध्ये चांगले शोषले जाते. म्हणूनच हे संयोजन महत्त्वाचे आहे आणि याला फूड सिनर्जी म्हणून ओळखले जाते." असे त्यांनी सांगितले. तथापि, जर तुम्हाला लॅक्टोज इनटोलरन्स , उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल किंवा तुम्ही रक्त पातळ करणारे सप्लिमेंट घेत असाल, तर हे पेय घेण्यापूर्वी वैद्यकीय मार्गदर्शन घेण्याचा सल्ला घ्यायला विसरू नका.

halad dudh.jpg

हळदी दुध कसा बनवायचे?

हे पेय बनवण्यासाठी पॅन गरम करून त्यात १ चमचा तूप घाला. यामध्ये ½ टीस्पून हळद, ½ टीस्पून काळी मिरी, जायफळ आणि दालचिनी घाला. मसाला मिक्स १ मिनिट ढवळा आणि दूध घाला, साखर घालून गरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ; गोळीबारात एक जण गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माेठी बातमी! 'शिरवळमध्ये भरदिवसा गाेळीबार'; घटना सीसीटीव्‍हीत कैद, तिघांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ, नेमकं काय घडलं..

Chh. Sambhajinagar Accident : माळीवाडा पुलावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य

सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘या’ लाखो लोकांचे जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार आणि पोलिसांकडून दाखले जप्त होणार, नेमका आदेश काय?, वाचा...

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

SCROLL FOR NEXT