Kadhiwada
Kadhiwada 
फूड

खाद्यभ्रमंती : नारायणगावजवळचा ‘परिवार’चा कढीवडा

आशिष चांदोरकर

आता बरोबर एक वर्ष होईल... मी आणि विश्वनाथ बुलेटवरून भोपाळला जाऊन आलो. कोरोनाच्या महासंकटामुळं ‘लॉकडाउन’ जाहीर होण्याआधी आमची मस्त ट्रीप जमून आली. बुलेट म्हणजे वेग, ताकद आणि शान, याचा अनुभव ‘थंडरबर्ड’ चालविताना येत होता. भोसरी, मोशी, चाकण, राजगुरुनगर आणि मंचर पाहता पाहता मागे पडत होती.

गाडी चालविताना सर्वांत मोठं आव्हान होतं, ते रस्त्याच्या दुतर्फा असलेले मिसळ, कटवडा आणि कढीवड्याच्या स्पॉट्सकडं दुर्लक्ष करण्याचं. शक्य तेवढा लांबचा पल्ला गाठू आणि नाश्त्याला थांबू, असं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार नारायणगावजवळचं प्रसिद्ध राजकमल सुरू असेल, तर तिथं थांबणार होतो, पण नेमकं ते देखील उघडलेलं नव्हतं. नारायणगाव मागं टाकल्यानंतर ‘परिवार’ नावाचा एक जॉइंट दिसला. गाड्यांची आणि माणसांची बऱ्यापैकी गर्दी होती. गर्दी होणाऱ्या बहुतांश ठिकाणी स्वादिष्ट आणि दर्जेदार पदार्थ मिळतात हा आजवरचा अनुभव. त्यामुळं ‘परिवार’जवळ थांबलो.

ऑर्डर देण्यासाठी फार विचार करावा लागला नाही. अर्थातच, दोघांनी पहिल्यांदा एक मीडियम मिसळ मागविली. उसळ, तर्री आणि भुरभुरलेल्या कुरकुरीत शेवेमुळं मिसळ स्वादिष्ट लागत होती. पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-माणगांव आणि पुणे-नगर अशा कोणत्याही महामार्गावर असाल तर बहुतांश ठिकाणी मिसळ चांगलीच मिळते. थोडंसं उन्नीस-बीस. मिसळची डिश साफसूफ केल्यानंतर मग आम्ही कढीवडा ऑर्डर केला. दोघांत एक. दूरचा पल्ला गाठायचा असल्यामुळं सुस्ती येऊन उपयोग नव्हता. चवीला गोडसर असणारी कढी एक नंबर. वाट्यावर वाट्या नक्कीच ओरपता आल्या असत्या, पण आम्हाला आवरतं घ्यावं लागलं. इथंही कुरकुरीत शेवेनं वड्याची शोभा वाढविली होती.

कढी आणि बटाटेवडा हे अजब किंवा थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन कुठून आणि कसं सुरू झालं माहिती नाही. राजगुरुनगरमधलं ‘आकाश’ आणि मंचरमधील ‘मयूर’मध्ये पूर्वी एक दोनदा कढीवडा खाल्लेला. पुण्यातही कढीवडा मिळेल, अशा पाट्या एक-दोन ठिकाणी पाहायला मिळाल्या होत्या. एकदम अफलातून डिश. ‘परिवार’मधील कढीवड्यानं आम्हाला या पदार्थाच्या प्रेमात पाडलं. एकदम लाजवाब. कढी आणि वडा ही गट्टी ज्यानं जमविली त्याला सलाम. कढीवड्याचं गणित समजत नाही. इकडे पुणे-नाशिक रोडप्रमाणंच तिकडं सांगलीतील विट्यात यशवंतनगरमध्ये ‘चोथे टी स्टॉल’मध्ये मिळणारा कढीवडा नि कटवडा देखील झकास असतो. कधी गेलात तर नक्की ट्राय करा. मागं एकदा यवतमाळला भजी आणि बटाटेवड्यासोबत कढीजवळ जाणारा पदार्थ अर्थात, फोडणीचं ताक दिलं होतं. ज्यानं कोणी वड्याची कटाऐवजी कढीसोबत कधीही न तुटणारी युती जमवून आणण्याचं स्वादिष्ट ‘कारस्थान’ रचलं त्याचं मनःपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे.

‘परिवार’मध्ये कढीवडा खाताना असं लक्षात आलं, की आयला वडा भलताच भारीय. दोघांनी नुसत्या नजरेनं असं ठरवलं, की एक वडाही मागवून पाहायला हवा. दोघांत सिंगल वडा मागविला. खूपच दूर जायचं असलं, तरीही आपल्याला घाई नाही. सावकाश जाऊ, या नोटवर वड्याचा आधी तुकडा आणि नंतर फडशा पाडला. नुसता बटाटेवडा चांगला लागत होताच. वादच नाही, पण वड्याचा कढीसोबत जमलेला संसार अधिक चांगला वाटत होता.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT