फूड

Bajri Halawa Recipe : बाजरीची भाकरीच नाही तर हलवाही आहे स्वादिष्ट अन् पौष्टिक!

बाजरीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी आपल्याला ठणठणीत ठेवतात.

सकाळ डिजिटल टीम

बाजरी हा धान्याचा एक प्रकार आहे. पूर्वीच्या काळी जनावरांसाठी बाजरीचं पीक घेतलं जात असे. पण बाजरीचे गुणधर्म जाणून घेतल्यानंतर लोकांनी त्याचा आहारात समावेश करायला सुरुवात केली. अनेक देशांनी त्याचे उत्पादन सुरू केले आहे. जगभरात बाजरीच्या अनेक जाती आढळतात.

आपल्या भारतात बाजरीची लागवड राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील उष्ण ठिकाणी केली जाते. बाजरीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जी आपल्याला ठणठणीत ठेवतात. बऱ्याच लोकांना बाजरीची भाकरी खायला आवडते, जी वजन कमी करायला मदत करते आणि कॅलरीज वाढवते.

दररोज 50-200 ग्रॅम बाजरीचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल आणि ट्रायसिग्लिसरॉलच्या पातळीवर मात करून तसेच बॉडी मास इंडेक्स नियंत्रित राहते. त्यामूळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचा धोका कमी होतो. ह्या संबंधीचा अभ्यास, पाच संस्थांनी आणि इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर दी सेमी-एरिड ट्रॉपिक्सच्या नेतृत्वाखाली केला होता.

बाजरी पोषक तत्वांनी समृद्ध आहे. त्यात कॅलरीज, , प्रथिने, खनिज फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह असे बरेच घटक आहेत. त्यामूळे हिवाळ्यात एनर्जेटीक रहायला बाजरी मदत करते.

बाजरीचा हलवा कसा करायचा

हिवाळ्यात हलवा बनवण्यासाठी बाजरी थोडी गरम करून त्याचे पीठ दळून आणा. एका कढईत एक चमचा तूप टाका आणि बाजरीचे पीठ सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. यात साखर घातली तरी चालते. पण गुळ घालणे कधीही चांगले. दुसऱ्या एका भांड्यात गुळाचा पाक तयार करा.

बाजरीचे पीठ भाजल्यावर त्याचा खमंग वास येतो. त्यावेळी त्या पिठात गुळाचा पाक घालून चांगले मिक्स करा. त्यावर तूम्ही ड्रायफ्रुट्सही घालू शकता. यावर अजून थोडे तूप आणि पाणी घालू शकता. झाकण ठेऊन ते चांगले शिजू द्या. एक वाफ गेली की गरम गरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT