फूड

फक्त केळ नव्हे, तर त्याचे फुलही असते आरोग्यासाठी फायदेशीर!

सकाळ डिजिटल टीम

आरोग्यासाठी केळ खूप फायदेशीर असते. केळामध्ये कित्येक प्रकारचे पोषक तत्व मिळतात. केळासोबत त्याचे फुल देखील आरोग्यासाठी फायदेशीर असते. भारतामध्ये काही क्षेत्रांमध्ये केळाचे फुलाची भाजी देखील बनवून खातात कारण ती ते अत्यंत चविष्ट असते. केळाचे फुल हे त्याच्या फळाप्रमाणे फायदेशीर असते. केळाच्या फुलामध्ये फॉस्फरस, कॅल्शिअम, पोटॅशिअम, तांबे, मॅन्गेशिअम आणि लोह इ भरपूर पोषक तत्वांचा समावेश असतो. तुम्हाला केळाच्या फुलाचे फायदे आज आम्ही सांगणार आहोत.(Banana Flower Benefits for health)

केळाच्या फुलाचे फायदे (Benefits Of Banana Flower)

पचनासाठी केळाचे फुल अत्यंत फायदेशीर असल्याचे मानले जाते. पचन संबधीत समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी फुलाचा वापर केला जातो. केळाच्या फुलाचे सेवन केल्यास तुम्हाला पोटदुखी, अपचन, अॅसिटीडी इ. पासून सुटका मिळते असे मानले जाते.

पोटदुखीपासून सुटका मिळविण्यासाठी

पोटदुखीपासून सुटका मिळविण्यासाठी केळाचे फुल फायदेशीर ठरते. त्याशिवाय नियमित सेवन केल्यास मासिक पाळीच्यावेळी होणारी अत्याधिक ब्लिडिंगच्या समस्येपासून देखील सुटका मिळते. दह्यासोबत केळाच्या फुलाचे सेवन केल्यास शरीरामध्ये प्रोजेस्टेरोन हार्मोन वाढतो आणि रक्तस्त्राव कमी होतो.

केळाचे फुलामुळे जसे तुमचे पाचन सुधारू शकतो त्याचप्रमाणे तुमचा मूड देखील सेट करू शकतो. त्यासोबतच स्तनपान करण्याऱ्या महिलांसाठी देखील फायदेशीर मानले जाते. स त्यामुळे दुधाचा स्त्राव वाढतो असे मानले जाते.

अॅनिमियावर फायदेशीर

अॅनिमिया म्हणजेच शरीरामध्ये रक्ताची कमी ही समस्या आज सर्वसाधारण झाली आहे. या समस्येपासून सुटका मिळविण्यासाछी तुम्ही केळाच्या फुलाचे सेवन करू शकता. केळ्याचे फूल शरीरामध्ये लोहची कमी भरुन काढतो आणि रक्ताची कमतरताही पूर्ण करण्यास फायदेशीर ठरतो.

केळ्याचे फुल हे नैसर्गिक एंटीडिप्रेसेंट

मॅग्नेशिअमचे भरपूर मात्रा असलेले केळ्याचे फूल तुमच्या मूडसाठी चांगले आहे. केळ्याचे फुल हे नैसर्गिक एंटीडिप्रेसेंट म्हणून देखील कार्य करत असल्यामुळे तुमचा मूड चांगला बनवितो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT