फूड

Weird Food Trend: चॉकलेट समोसा पाव; तुम्ही कराल का ट्राय?

सकाळ डिजिटल टीम

भारतातील प्रसिध्द स्ट्रीट फूडचा विषय निघाला की, समोसा, चाट, पाव, पावाभाजी या पदार्थांचा हमखास उल्लेख केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील या स्ट्रीट फूडवर अनेक विचित्र आयडिया वापरून काही प्रयोग होत असल्याचे सोशल मीडियावर आपण पाहतो.

आपल्यापैकी कित्येक जणांना समोसा खूप आवडतो. पण तुम्हाला माहितीये का की, भारतात विविध ठिकाणी समोसा खाण्याची पध्दत देखील वेगळी आहे. काही लोक छोलेसोबत, तर काहींना आलू करी किंवा चटणी सोबत समोसा खातात. काही ठिकाणी समोसा पाव देखील खातात. पण आता एक वेगळाचा समोसा सोशल मिडियावर ट्रेंड होत आहे तो म्हणजे चॉकलेट समोसा पाव! होय तुम्ही बरोबर ऐकत आहात. (Street vendor makes Chocolate Samosa Pav video leaves internet shocked)

सोशल मिडियावर एका विक्रेत्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो पावाला चॉकलेट सिरम लावून त्यासोबत समोसा ठेवत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @rjkhurki या अकाऊंटवर शेअर केला आहे. एका स्ट्रीट फूड विक्रेता चॉकलेट समोसा पाव विकत असल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये, विक्रेता सर्वात आधी पाव कापतो आणि त्यावर चॉकलेट सिरप लावतो. त्यानंतर त्यापावाच्या मधोमध एक समोसा ठेवतो आहे आणि त्यावर मायोनिजचे टॉपिंग करतो आहे. हा व्हिडिओ पोस्ट करणआऱ्या व्यक्तीने व्हिडिओवर "बंद करो बकावास'' अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता पर्यत या व्हिडिओला 3.1 मिलियन व्हयुज आणि 85.4 लाईक मिळाले असून खूप साऱ्या कॉमेटस् देखील आल्या आहेत.

कित्येक जणांनी या व्हिडिओवर नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, ''भाऊ, म्हणून एलियन्स पृथ्वीवर येत नाही''. एका युजरने सांगितले आहे की, हा समोसा 'जुगाडी अड्डा' येथे मिळत आहे. हा समोसा खूप वेगळा आहे. या समोस्याच्या आत बटाट्या ऐवजी चॉकलेट वापरतात''

पण, या चॉकलेट समोसा पावची टेस्ट कशी असेल याचा अंदाज लावणे थोडे अवघड आहे. पण तुम्ही जर हा पदार्थ कधी ट्राय केला नसेल तुम्हाला हा पदार्थ ट्राय करायला आवडेल का? तुम्ही चॉकलेट समोसा पाव ट्राय केला असेल किंवा करणार असाल तर तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT