Breakfast Recipe: Sakal
फूड

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात बनवा आलू शिमला मिरचीचा पराठा, जाणून घ्या रेसिपी

Breakfast Recipe: जर तुम्हालाही नाश्त्यात पराठा खायला आवडत असेल तर यंदा बटाटा शिमला मिरचीचा पराठा करून पाहू शकता.

Puja Bonkile

Breakfast Recipe potato shimla mirchi paratha recipe try at home

अनेकांना नाश्त्यामध्ये पराठे खायला आवडते. त्यामुळे अनेक घरांमध्ये सकाळी किंवा संध्याकाळ पराठे बनवले जातात. एकाच प्रकारचे पराठे खाऊन बोर झाले असाल तर यंदा शिमला मिरचीचा पराठा जरूर करून पहा. हा पराठा बनवणे अगदी सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया पराठा कसा बनवावा.

  • पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पीठ - 5 कप

उकडलेले बटाटे - 3

लसूण - 3 पाकळ्या

जिरं - 1/2 टीस्पून

शिमला मिरची-2 वाफवलेली

कांदा - 1 बारीक चिरलेला

आलं - 1/2 इंच

हळद - 1/2 टीस्पून

कोथिंबीर - सजावटीसाठी

मीठ - चवीनुसार

लिंबाचा रस - 1 टीस्पून

तेल - 3 चमचे

  • आलू शिमला मिर्च पराठा बनवण्याची कृती

सर्वात आधी बटाटे आणि शिमला मिरची स्वच्छ करून चांगले उकळवा.

बटाटे आणि शिमला मिरची उकळल्यावर बटाटे सोलून दुसऱ्या भांड्यात ठेवा. थंड झाल्यावर बटाटे आणि शिमला मिरची चांगली मॅश करा.

बटाटे आणि शिमला मिरची मॅश केल्यानंतर या मिश्रणात मीठ, हळद, कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा इत्यादी टाकून चांगले मिक्स करा आणि एका भांड्यात झाकून ठेवा.

एका भांड्यात पीठ ठेवून आवश्यकतेनुसार पाणी घालून चांगले मळून घ्यावे. पीठ मळून झाल्यावर पराठ्यासाठी गोळे बनवा. आता बटाट्याचे मिश्रण गोळ्यांमध्ये टाकून चांगले लाटून घ्या.

यानंतर तवा गरम करा आणि पराठे दोन्ही बाजूने तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.

तुम्ही लोणच्यासोबत किंवा आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agniveer Scheme : अग्निवीरांबाबत लष्कराने घेतला मोठा निर्णय! जर 'परमनंट' व्हायचं असेल, तर लग्न करता येणार नाही

Video: हिंदू मंदिर लुटून मुस्लिम शहर उभं राहिलं! सोमनाथ मंदिराच्या लुटीला झाले एक हजार वर्षे; गझनीने नेमकं काय केलं होतं?

Pune Political: राष्ट्रवादी कॉंग्रेस श. प गटाच्या ५ उमेदवारांवर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई!

Bangladesh Hindu journalist shot dead: बांगलादेशात आता भरबाजारात हिंदू पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या!

UPSC Success Story : पित्याचे छत्र हरपले, आईचे कष्ट पाहावले नाही; दिवसा नोकरी अन् रात्री अभ्यास, पहिल्यात प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण

SCROLL FOR NEXT