Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : मुलं मेथीची भाजी खायला करतात टाळाटाळ, मग त्यांना द्या हा पौष्टीक अन् खमंग नाष्टा

Methi Thepala Recipe : मुलांना पालेभाजी खाऊ घालण्याची एक सोपी रेसिपी आपण जाणून घेऊयात

सकाळ डिजिटल टीम

Healthy Breakfast Recipe :

दररोजची चपाती-भाजी खाऊन प्रत्येकालाच काहीतरी वेगळं खावंस वाटतं. प्रत्येकजण म्हणतो की आज काहीतरी वेगळं हवंय. ग्रामिण भागात चपाती कमी अन् भाकरी,दही-धपाटे, वेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात.

पण, शाळेला जाणाऱ्या मुलांच्या डब्यात काय वेगळं द्यायचं हा मोठा प्रश्नच असतो. कारण, मुलं पालेभाज्या खात नाहीत. त्यामुळे सर्रास मुलांच्या डब्यात बटाटा किंवा कोणतीतरी फळभाजीच असते. डॉक्टर सांगतात की, मुलांना पालेभाज्या खाऊ घाला. मुलं ऐकत नाहीत. पण, काळजी करू नका. मुलांना पालेभाजी खाऊ घालण्याची एक सोपी रेसिपी आपण जाणून घेऊयात.  

साहित्य -

२ वाट्या कणिक (गव्हाचे पीठ), १ वाटी ज्वारीचे व १ वाटी बाजरीचे पीठ, १ वाटी बारीक चिरलेली मेथी (निवडून, धुवून, चिरणे), पाव वाटी दही, १ टे. स्पून पांढरे तीळ, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसूण पाकळ्या व आलं एकत्र वाटून, मीठ, साखर, तेल, १ टी.स्पून ओवा, पाव टी. स्पून बेकिंग पावडर.

कृती :

गव्हाचे पीठ, बाजरीचे पीठ, ज्वारीचे पीठ, चिरलेली मेथी, मीठ, साखर, दही, ओवा, तीळ, मिरची, लसूण, आलं पेस्ट व बेकिंग पावडर,२ टे.स्पून तेलाचे मोहन घालून घट्ट पीठ भिजवावे.

पातळ पोळ्या लाटून तव्यावर फडक्याने दाबून दोन्ही बाजूंनी खमंग भाजाव्यात भाजताना थोडे तेल लावावे.

ठेपले बरेच दिवस टिकतात, प्रवासात उपयोगी पडतात. ज्वारीचे पीठ न घेता २ वाट्या बाजरीचे पीठ घेतले तर आणखी खमंग होतात. दह्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रस वापरला तरी चालतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT