Breakfast Tips esakal
फूड

Breakfast Tips : धनत्रयोदशीला बनवा धणे घालून झटपट पोहा कटलेट

आज आपण ब्रेकफास्ट टिप्समध्ये हे धणे घालून बनवण्यात येणाऱ्या झटपट पोहा कटलेटची रेसिपी बघूया.

सकाळ डिजिटल टीम

Coriander Poha Cutlet for breakfast : आज धनत्रयोदशी आहे. या दिवशी धण्यांना फार महत्व असते. धणे विकत आणून त्याचं नैवेद्य दाखवलं जातं. आणि आज धणे खाण्यालाही महत्व दिलं गेलं आहे. त्यामुळे आज आपण ब्रेकफास्ट टिप्समध्ये हे धणे घालून बनवण्यात येणाऱ्या झटपट पोहा कटलेटची रेसिपी बघूया.

साहित्य

३ वाट्या पोहे, २ उकडलेले बटाटे, १ टेबल स्पून धणे, २-३ मिरच्या, १ वाटी मैदा, १ वाटी ब्रेडक्रम्स, २ बारीक चिरलेले कांदे, बारीक चिरलेली कोथिंबीर, जीरेपूड, हळद, मीठ, तिखट, आमचूर पूड, तेल

कृती -

  • २ वाटी पोहे स्वच्छ करून धूवा. उरेलेल्या १ वाटी पोह्यांना मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्या.

  • उकलेल्या बटाट्यांना मॅश करून ओल्या पोह्यांमध्ये मिक्स करा. त्यात धणे मिक्सरमधून जाडसर भरडून घालावे.

  • तिखट, मिठ, बारीक चिरलेल्या मिरच्या, जीरेपूड, आमचूर पूड, चाट मसाला, गरम मसाला, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून त्यात पूड केलेले पोहे घाला.

  • नंतर या सगळ्याची छान कणिक मळा.

  • दुसऱ्या बाऊलमध्ये मैदा, मिर पूड आणि मीठ घालून त्याची पातळसर पेस्ट बनवा.

  • एका प्लेटमध्ये ब्रेडक्रम घ्या.

  • धणे, पोहे, बटाट्याच्या कणकेचे लांबूळक्या आकाराचे गोळे बनवा.

  • ते गोळे मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून ब्रेडक्रममध्ये घोळवा.

  • नंतर गरम तेलात हे छान लालसर गोल्डन रंगात तळा

  • तुमचे टेस्टी गरमागरम धणे घालून केलेले पोहा कटलेट तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT