Butter Chakali esakal
फूड

Butter Chakali: कुरकुरीत चकल्या सगळ्यांनाच आवडतात, एकदा ही बटर चकली ट्राय तर करून पहा

सगळ्याच पदार्थाला बटर घातलं की त्याची चव अधिक वाढते

Pooja Karande-Kadam

Butter Chakali : नवरात्र, विजयादशमी यानंतर आता दिवाळीची चाहुल लागली आहे. गृहिणींची फराळासाठी नवी शोधमोहीम सुरू झाली आहे. पारंपरिक पदार्थांसोबतच वेगळ्या चवीच्या रेसिपीही दिवाळीत ट्राय केल्या जातात.

पूर्वीच्या काळात महिला पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनेच फराळ बनवायच्या. पण आता जून्याच रेसिपींना नवा तडका दिलेला असतो. त्यामुळे जुन्याचं महत्त्वही टिकतं अन् नवी चवही चाखायला मिळते.

फराळातील सगळेच पदार्थ चवदार असतात. पण त्यातही चकलीची जागा जरा वेगळ्या चवीची आहे. सगळ्याच पदार्थाला बटर घातलं की त्याची चव अधिक वाढते, फक्त ते प्रमाणात घालावे लागते.

झटपट होणारी रेसिपी म्हणून तुम्ही बटर चकली नक्कीच ट्राय करू शकता 

साहीत्य – फुटाणे डाळ २ वाटी, भाजलेले बेसन पीठ १ चमचा, तांदळाचे पीठ १ चमचा, बटर १ चमचा, जीरे, हिंग, मीठ आवश्यकतेनुसार

कृती

एका भांड्यात सर्व पिठे आणि मसाले एकजीव करा. आवश्यक असेल तसे पाणी घालून घट्ट पिठ मळून घ्या. पिठा चांगले एकजीव करून त्याचा गोळा करून घ्या.

गोळ्याला चिर पडत असेल तर थोडा पाण्याचा अन् तेलाचा हात लावून चांगले मळून घ्या.

आता पिठाचा गोळा चकलीच्या साच्यात भरा. आणि कागदावर चकली पाडा. कढईत तेल तापायला ठेवा. 

तेल चांगले उकळले की गॅस पूर्ण बारीक करा. आणि चकली मंद आचेवर तळून घ्या. ही चकली तोंडात टाकताच विरघळते.  एका वेगळ्या चवीची चकली नक्की ट्राय करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT