Chana Dal Modak Recipe  esakal
फूड

Chana Dal Modak Recipe : बाप्पासाठी बनवा चणा दाळीचे चविष्ट मोदक, लगेच नोट करा रेसिपी

घरीच बनवा चणा दाळीचे मोदक

साक्षी राऊत

Chana Dal Modak Recipe : गणेश चतुर्थीचा उत्सह देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्रात तर बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. तेव्हा बाप्पासाठी मोदकाच्या तयारीला आत्ताच सुरुवात करायला हवी. तुम्ही घरीच चणा दाळीचे मोदक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

चणा दाळ मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

तांदळाचे पीठ

मीठ

उकळलेले पाणी

तिळाचे तेल

गूळ

राणी

चणा दाळ

किसलेले खोबरे

विलायची पावडर

तूप

कसे बनवाल चणा दाळीचे मोदक

चणा दाळीचे मोदक बनवण्यासाठी चणा दाळ पाणी टाकून कुकरमध्ये शिजवा. ४ सीटी होतपर्यंत कूकरमध्ये शिजू द्या. आता ५ मिनिटे स्लो फ्लेमवर ठेवा. आता फ्लेम बंद करा आणि थंड होतपर्यंत ठेवा. (Recipe)

आता एका पॅनमध्ये गूळ घ्या. गूळ वितळेपर्यंत गरम होऊ द्या. आता हा गूळ चाळणीतून काढून वेगळा ठेवा. त्याला परत त्यात पॅनमध्ये घ्या. आता त्यात नारळाचा किस, शिजलेली चणा दाळ मिक्स करून घ्या. आता घट्ट होतपर्यंत हे मिश्रण शिजवा. त्यात विलायची पावडर, तूप मिसळून घ्या. आता हे मिश्रण एका कटोऱ्यात काढून थंड होऊ द्या.

आता कणीक मळून घ्या. त्यासाठी एका पॅनमध्ये पाणी घ्या. त्यात एक चिमूट मीठ आणि १ लहान चमचा तेल घाला. आता पाण्याला उकळी आली की त्यात तांदळाचे पीठ घाला. आणि त्याला चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. आता हे पीठ १५ मिनिटांपर्यंत थंड होऊ द्या. थंड झाल्यावर त्यात १ चमचा तेल घालून कणीक मळून घ्या. (Modak)

आता मोदकाचा साचा घ्या. त्याला थोडे तूप लावा. आता कणकीचा छोटा तुकडा घ्या आणि साच्यात समान भागात पसरवा. त्यात स्टफिंग घाला आणि कणकीने कव्हर करून घ्या. आता साचा खोलून तयार झालेला मोदक प्लेटमध्ये ठेवा. सगळे मोदक तयार झाल्यानंतर स्टीमरमध्ये ठेवा. आता याला ८-१० मिनिटे स्टिम करा. तुमचे चविष्ट मोदक तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Water Pipeline Burst: फारोळा जलशुद्धीकरण केंद्राची १२०० मिमी जलवाहिनी फुटली; छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT