दाळीचे फुडके  सकाळ डिजिटल टीम
फूड

Healthy नाश्ता हवाय? मग डाळींचे फुडके ट्राय करा

मराठवाडा ,विदर्भ आणि खान्देशात पारंपरिक पद्धतीने केले जाणारे डाळीचे फुडकेची रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात पारंपरिक पद्धतीने केले जाणारे डाळीचे फुडके यांची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. काही भागात याला मुटकुळे देखील म्हणतात. घरात असलेल्या डाळी किंवा डाळीचा चुरा ह्यापासून तयार होणारा पारंपरिक पदार्थ म्हणजे फुडके आणि सोबतीला असते ताकाची कढी. विशेष म्हणजे यात आपण आपल्या आवडीची कोणत्याही दाळी वापरू शकतो.

डाळीच्या फुडक्यासाठी लागणारे साहित्य

1) १वाटी हरभरा डाळ (चनाडाळ)

2) अर्धी वाटी मुगडाळ

3) लसुन ,आलं, हिरवी मिरची

जिरं, हींग, हळद ,मीठ ,सोडा चवीनुसार

4) कांदे -2(बारीक चिरलेले)

5) तेल

6) कोथिंबीर भरपूर

7) पाणी

*दाळीच्या फुडक्यासाठी लागणारे साहित्य

1) १वाटी हरभरा डाळ (चनाडाळ)

2) अर्धी वाटी मुगडाळ

3) लसुन ,आलं, हिरवी मिरची

जिरं, हींग, हळद ,मीठ ,सोडा चवीनुसार

4) कांदे -2(बारीक चिरलेले)

5) तेल

6) कोथिंबीर भरपूर

7) पाणी

कृती -

  • सर्वप्रथम दोन्ही डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या .

  • नंतर त्या दोन्ही दाळी वेगवेगळ्या भांड्यात भिजु घालायच्या साधारणपणे दाळी 6 ते 7 तास भिजत ठेवल्यानंतर ते पाणी फेकून दयायचे. आणि डाळी धुऊन घ्यायच्या.

  • धुतलेल्या दाळी चाळणीवर काढून त्यातील सगळं पाणी निघुन जाऊ दयायचे .नंतर मग मिक्सरमध्ये दाळी, हिरव्या मिरची ,लसूण ,जिरं वाटून घ्या.

  • मिक्सर मधुन काढतांना मात्र हे मिश्रण जरा जाडसर काढा.

  • नंतर सर्व मिश्रण एका भांडयात काढून त्यात कापलेला कांदा ,हींग ,हळद ,मीठ ,थोडे तेल ,भरपूर कोथिंबीर ,आणि सोडा आणि दाळीचे बारीक केलेले मिश्रण छान एकजीव करुन घ्या .

  • नंतर हाताने त्याचे छोटे छोटे फुडके (मुटकुळे)करून गॅसवर एका पातेल्यात पाणी ठेवुन त्यावर ताराची चाळणी ठेवुन त्यावर फुडके टाकुन झाकण ठेवा .त्याला 20 मिनिटे चांगल वाफेवर होऊ दया. (ताराच्या चाळणीला फुडके टाकण्याआधी थोडे तेल लावा जेणेकरुन ते चाळणीला चिकटणार नाही)

  • मग 20 मिनिटानंतर आरामात झाकण काढून .एकदा चाचपणी करून बघा फुडके शिजले की नाही.

  • शिजले असल्यास त्यावर छान थोडसं तेल टाकुन तुम्ही ते मसाल्याच्या भाजी ,ताकाची कढी सोबत किंवा पोळीसोबत घाऊ शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT