cheese  
फूड

Cheese Lover's Day: चीज खाल्ल्याने होतात चार फायदे! जाणून घ्या

चीजमध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात

सकाळ डिजिटल टीम

भरपूर चीज (Cheese) घातलेला पिझ्झा, बर्गर, सॅण्डवीच असे पदार्थ आता सगळ्यांना आवडतात. चीजमध्ये अनेक पोषकतत्त्वे असतात. त्यात प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, फॉस्फोरस, मॅग्नीशियम, झिंक, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि विटामिन के-2 सारखे तत्व आढळतात. एक चीज स्लाईस एक ग्लास दूधाइतके (Milk) मानले जाते. पण मर्यादित प्रमाणात चीज खाल्याने (Food) शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. ते कोणते जाणून घेऊया.

mozzarella cheese pizza

असे आहेत फायदे(Health Benefits)

ऑस्टिओपोरोसिससाठी फायदेशीर

ऑस्टिओपोरोसिस हा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो. रजोनिवृत्ती होताना स्त्रियांमध्ये हे सामान्य आहे. याव्यतिरिक्त, वृद्ध आणि कुपोषित मुलांमध्ये असे आढळते. प्रथिने, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे समृध्द आहाराने त्यावर उपचार करता येतात. हे तिन्ही चीजमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. ऑस्टियोपोरोसिसचा त्रास असलेले लोक त्यांच्या आहारात चीजचा समावेश करू शकतात.

आतड्यांना फायदा

सॅच्युरेटेड फॅटने समृद्ध असलेल्या चीजमध्ये सूक्ष्म जीवाणू असतात, जे आतडे निरोगी ठेवण्यास मदत करतात. चयापचय प्रक्रिया वाढवण्यासाठी आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी चीज फायदेशीर आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन बी-12 आणि बॅक्टेरिया पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. यामध्ये ओमेगा ३,६ आणि मेंदूसाठी फायदेशीर अमीनो अॅसिड असतात.

weight loss

वजन होईल कमी

चीजमध्ये असलेली नैसर्गिक चरबी वजन वाढू देत नाही. बाजारात अनेक प्रकारचे चीज उपलब्ध आहेत, ज्यामध्ये कमी चरबी असते. अशावेळी तुम्ही कमी चरबीयुक्त चीजचा आहारात समावेश करू शकता. त्यात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे असतात. त्यामुळे स्नायू मजबूत होतात.

High BP

प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत

चीजमध्ये व्हिटॅमीन भरपूर प्रमाणात असतं यामुळे तुम्ही आजारी पडण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे चीज खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन सी मिळते तसेच प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

उच्च रक्तदाब कमी होतो

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी चीज खाल्ल्यास त्यांचा सिस्टोलिक रक्तदाब २-४ मिमी एचजी कमी होऊ शकतो. तुम्ही तुमच्या सोडियमच्या सेवनाबद्दल जागरूक असले पाहिजे. दररोज 1,500 मिलीग्रामपेक्षा जास्त सोडिअमचे सेवन करू नये. पॅकेजिंग उत्पादनाची तपासणी केल्यानंतरच कमी सोडियमचा प्रकार निवडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT