Christmas Special Recipe Esakal
फूड

Christmas Special Recipe: ख्रिसमस स्पेशल घरच्या घरी बनवा एगलेस ड्रायफ्रूट केक

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा केक तुम्ही आठ दिवस खाऊ शकता.

सकाळ डिजिटल टीम

Eggless Dry Fruit Cake: घरातील लहान मुलांची ख्रिसमसला केक खाण्याची इच्छा असते. तुम्ही बाजारातून केक विकत घेण्यापेक्षा तुम्ही अंडी शिवाय घरच्या घरीही चविष्ट केक बनवू शकता. हा एगलेस ड्रायफ्रूट केक मुलांनाही आवडेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा केक तुम्ही आठ दिवस खाऊ शकता. चवीबद्दल बोलायचे झाले तर ते अगदी बाजारातील चवीप्रमाणेच बनवले जाते. चला तर मग आजच्या लेखात एगलेस ड्रायफ्रूट केक कसा बनवायचा याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

साहित्य

1) मैदा

2) मीठ

3) बेकिंग पावडर

4) दूध

5) कंडेन्स्ड मिल्क

6) ड्राय फ्रूट्स

7) बटर

8) व्हॅनिला इसेन्स

कृती:एक बाऊल घ्या आणि त्यात मैदा आणि मीठ मिक्स करा. आता त्यात बेकिंग पावडर गाळून घ्या. आता त्यात दूध आणि कंडेन्स्ड मिल्क घ्या आणि या भांड्यात चांगले मिक्स करा आणि फेटून घ्या. ते चांगले फेटून घ्या म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाहीत. आता त्यात अर्ध्या चमचा पेक्षा कमी व्हॅनिला इसेन्स टाका. आता बेकिंग ट्रेला बटरने चारी बाजूने ग्रीस करा. आता त्यात मिश्रण फिरवून त्यावर ड्राय फ्रूट्स टाका. ओव्हन 120 डिग्री सेंटीग्रेड ते 150 सेंटीग्रेडवर गरम करा आणि 20 मिनिटे बेक करा. तुमचा स्वादिष्ट केक तयार आहे. या केकसह ख्रिसमस साजरा करा. लहान मुलांनाही हा केक खूप आवडेल. जर तुम्हाला इतर कोणताही फ्लेवर घालायचा असेल तर तुम्ही ते देखील घालू शकता. जसे, तुम्ही त्यात चॉकलेट चिप्स आणि व्हॅनिला फ्लेवर देखील मिक्स करू शकता. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल, तर तुम्ही केक फुलवण्यासाठी त्यात इनो देखील टाकू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT