Chutney Batata Recipe esakal
फूड

Chutney Batata Recipe : तिच तिच भाजी पोळी खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा चटपटीत चटणी बटाटा रेसिपी

हिरवी चटणी खायला लोकांना खूप आवडते

सकाळ डिजिटल टीम

Chutney Batata Recipe : हिरवी चटणी खायला लोकांना खूप आवडते, आपल्याकडे ताटाच्या डाव्या कोपऱ्यात एकतरी चटणी तोंडी लावायला असतेच, काहींच्या घरी तर रोज हिरवी चटणी केली जाते. या चटणीमुळे अन्नाची चव वाढते. हिरवी चटणी पुदिन्याची चटणी, कोथिंबीरीची किंवा ओलं नारळ आणि मिरचीचीही बनवली जाते. पण तोंडी लावलेली चटणी भाजी म्हणून तुम्ही खाऊ शकतात हे माहिती आहे का? तुमच्या रेग्युलर चटणीला टेस्टी भाजी बनवण्यासाठी तुम्ही त्यात असे बदल करू शकतात, ही आहे रेसिपी

साहित्य

1. 6 हिरव्या मिरच्या

2. 10 पालकाची पानं

3. 8 लाल सुक्या मिरच्या

4. 1 टीस्पून आमचूर पावडर

5. 1 टीस्पून लिंबाचा रस

6. 1 टीस्पून - चाट मसाला

7. 3 चमचे - तेल

8. 10-15 बटाटे (उकडलेले)

9. चवीनुसार मीठ

10. 1 टीस्पून जिरे

11. 2 चमचे दही

12. 1 वाटी कोथिंबीर

13. 1 पॅकेट शेव

कृती:

1. बटाटे सोलून घ्या, धुवा आणि लहान तुकडे करा.

2. एका भांड्यात कोथिंबीर आणि पालकाची पाने निवडून धुवून वाळवण्यासाठी ठेवा.

3. आता मिक्सरमध्ये कोथिंबीर, पालक, जिरे, हिरवी मिरची, मीठ इत्यादी टाकून बारीक करा.

4. आता कढईत तेल टाका आणि गरम झाल्यावर त्यात जिरे टाका आणि थंड करा.

5. आता उकडलेले बटाटे, मीठ, लाल तिखट, चाट मसाला घालून मिक्स करा आणि नंतर हिरवी चटणी घालून 5 ते 7 मिनिटे ठेवा.

6. 7 मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि एका भांड्यात भाजी काढा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT