Chutney Recipe for Winter esakal
फूड

Chutney Recipe for Winter : थंडीत लाभदायक अशी कोथिंबीर आणि शेंगदाण्याची स्पेशल चटणी

शेंगदाणे आणि कोथिंबीरीची चटणी सुद्धा खूप सुंदर लागते

सकाळ डिजिटल टीम

Chutney Recipe for Winter : थंडीत आई एक गोष्ट खाण्यापासून अजिबात आवडत नाही आणि ती म्हणजे, शेंगदाणे आणि गूळ. कारण दोघंही शरीरासाठी खूप चांगले असतात. आपल्या घरातही अनेक पदार्थांमध्ये दाण्याचा वापर होत असतो. खास करून पोह्यांमध्ये तर शेंगदाणे सगळ्यांना खूप आवडतात.

शेंगदाणे आणि कोथिंबीरीची चटणी सुद्धा खूप सुंदर लागते आणि ही आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक सुद्धा असते. कोणत्याही पदार्थाची चव अजून छान करण्यासाठी आपण कोथिंबीरीचा वापर करतो. अशात बघूया कोथिंबीर आणि शेंगदाण्याची ही स्पेशल चटणीची रेसिपी.

साहित्य:

1/2 कप शेंगदाणे

1/2 कप कोथिंबीर

2-3 लाल मिरच्या

1 चमचा जिरं

2-3 चमचे तेल

3-4 लसणाच्या पाकळ्या

1 चमचा लिंबाचा रस

चवीनुसार मीठ

कृती:

कोथिंबीर निवडून ती स्वच्छ धुवून घ्या.

शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी 2-3 चमचे तेलात शेंगदाणे चांगले परतवून घ्या. 2-3 मिनिटांनी गॅस बंद करून शेंगदाणे बाजूला काढून घ्या.

आता त्या तेलात लसूण थोडा तळून घ्या.

एका मिक्सरच्या भांड्यात ते शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण जिरं, लाल मिरच्या सगळं काही बारीक करून घ्या.

आता हे एका बाउलमध्ये काढून घ्या. त्यात लिंबाचा रस टाका, चवीनुसार मीठ घाला.

आपल्या हवं तसं पाणी घालून छान मिक्स करा.

या पदार्थांसोबत सर्व्ह करा चटणी

वरण भात भाजी पोळीच्या ताटात तोंडी लावायला तुम्ही ही चटणी सर्व्ह करू शकतात.

संध्याकाळी भजे किंवा चाट बनवलं तर त्यासोबतही ही चटणी छान लागेल.

अगदी घरात भाजी नसेल तरीही तुम्ही चटणी पोळी खाऊ शकतात.

पराठ्यांसोबतही ही चटणी खूप छान लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT