cold coffee recipe esakal
फूड

Cold Coffee Recipe : कौतूक हवं असेल तर उन्हाळ्यात क्रीमी कोल्ड कॉफीने खास पाहुण्यांना करा खूश!

पाहुण्यांना सरबत देऊन बोअर न करता काहीतरी हटके द्या!

सकाळ डिजिटल टीम

रखरखत्या उन्हाळ्यात तूम्ही काही कामासाठी पाहुण्यांकडे गेलात. तर, ते सरबत करतात किंवा चहा घेणार का विचारतात. पण, क्वचित एखादा पाहुना फ्रुट सॅलेड, किंवा आयस्क्रीम, कोल्डींक्सने खूश करतो. तूमच्या घरात पाहुणे येणार असतील आणि ते जरा खासच असतील तर सरबत चहाला दूर सारून वेगळं काय बनवायचं हे पाहुयात.

तसं पाहिलं तर चहा कॉफी ही नेहमीचे सोबती आहेत. त्यातल्या त्यात कॉफी अनेकांची फेव्हरेट आहे. त्यामूळेच अनेकांना उन्हाळ्यात कोल्ड कॉफी पिणे आवडते. उन्हाळ्यात क्रीमी कोल्ड कॉफी बनवायची असेल. तर त्याची ही सोप्पी रेसिपी सेव्ह करून ठेवा.

कोल्ड कॉफीची ही रेसिपी मींट रेसिपीजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली गेली आहे. वाढते तापमान लक्षात घेता घरच्या घरीच थंडगार कॉफी बनवण्यासाठी हे सोपी आयडीया आहे.

कॉफीसाठीचे साहीत्य - क्रीमी कोल्ड कॉफी बनवण्यासाठी 4-5 चमचे कॉफी पावडर, 12 चमचे साखर, 1 कप थंड दूध, मेल्ट चॉकलेट ड चॉकलेट आणि काही बर्फाचे तुकडे घ्या.

क्रीमी कोल्ड कॉफी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कॉफी पावडर घ्या. त्यामध्ये साखर घालून बारीक करून घ्या. या मिश्रणाच्या बरणीत बर्फाचे तुकडे घाला आणि कॉफी चांगले मिसळा. कॉफी क्रीमी होईपर्यंत मिक्स करत रहा.

यानंतर वितळलेले चॉकलेट कपमध्ये घ्या. आता ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाका, त्यानंतर ग्लासमध्ये क्रीमी कॉफी घाला. आता त्यावर थंड आणि थंडगार दूध घाला. आणि वरून चॉकलेटने सजवा. आता त्यावर थोडी कॉफी पावडर शिंपडा. तुमची क्रीमी कोल्ड कॉफी तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT