Cooking Tips Sakal
फूड

Cooking Tips: भाजीत तिखट जास्त झाले तर 'असे' करा कमी, चवही होईल द्विगुणित

Cooking Tips: जर तुम्हाला भाजीमधला तिखटपणा कमी करायचा असेल तर स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करू शकता.

Puja Bonkile

Cooking Tips: भारतात मसालेदार पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जातात. विदेशातून देखील अनेक पर्यंटक पदार्थांची चव चाखण्यास येतात. पण अनेकदा असे घडते की मसालेदार पदार्थ बनवताना लोक चुकून जास्त मिरची पावडर घालतात. जर जास्त प्रमाणात मिरची पावडर घातली तर पदार्थ तिखट होतो आणि खाऊ शकत नाही. जर तुम्हाला भाजीमधला तिखटपणा कमी करायचा असेल तर घरगुती पदार्थांचा वापर करू शकता.

टोमॅटोची पेस्ट

भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी टोमॅटो पेस्ट वापरू शकता. यासाठी एका पॅनमध्ये टोमॅटो पेस्ट गरम करा नंतर भाजीमध्ये टाका. यामुळे तिखटपणा कमी होतो.

मैदा

भाजीमध्ये तीन ते चार चमचे मैदा टाकल्यास तिखटपणा कमी होतो. तसेच भाजीमध्ये असलेले जास्त पाणी कमी करण्यासाठी मैदाचा वापर करू शकता.

तूप

तुप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच त्याचा भाजीमधील तिखटपणा कमी करण्यासाठी देखील केला जातो. भाजीमध्ये तूप टाकल्यास तिखटपणा कमी होतो. तसेच चव देखील द्विगुणित होते.

साय

अनेक घरातील स्वयंपाक घरांमध्ये साय असतेच. जर भाजी खुप तिखट झाली असेल तर त्यात साय टाका आणि थोडावेळ शिजवा. यामुळे भाजीचा तिखटपणा कमी होईल आणि चव वाढेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT