maysore pak  esakal
फूड

Diwali Festival : तोंडात टाकताच विरघळणारा म्हैसूरपाक, वाचा रेसिपी

घरच्या घरीच तोंडात टाकताच विरघळणारा म्हैसूरपाक तुम्ही बनवू शकता.

सकाऴ वृत्तसेवा

घरच्या घरीच तोंडात टाकताच विरघळणारा म्हैसूरपाक तुम्ही बनवू शकता.

दिवाळी सण हा सर्वांचा आवडीचा सण. हा सण काही दिवसांवर आलाय. दिवाळीचा फराळ हा शक्यतो घरीच बनवणे पंसत करतात. लाडू, चकली चिवडा, शंकपाळे सर्व पदार्थ घरीच बनवितात. घरच्या घरीच तोंडात टाकताच विरघळणारा म्हैसूरपाक तुम्ही बनवू शकता. काहींना म्हैसूरपाक खूप आवडतो. चला तर मग म्हैसूरपाकची रेसिपी जाणून घेऊयात.

साहित्य

- एक वाटी हरभरा डाळीचे पीठ

- तीन वाट्या पातळ तूप

- दोन वाट्या साखर

- पाऊण वाटी पाणी

कृती

-चमचाभर तुपावर डाळीचे पीठ किंचित भाजा. नंतर साखरेत पाणी घालून साखर मंद आचेवर विरघळून घ्या.

- साखर विरघळल्यावर पीठ घालून मिसळा.

- लगेचचवरुन गरम तुपाची धार धरत एका हाताने मिश्रण हलवा. नंतर कालथ्याने मिश्रण ढवळत राहा.

- तूप पिठात मिसळते, बुडबुडे येतात, जाळी दिसते.

- त्याच्या कडेने तूप सुटल्यावर, मिश्रणातून बाहेर यायला लागल्यावर (साधारण तूप घातल्यानंतर10-11 मिनिटांनी) पातेले खाली उतरवून मिश्रण घोटून घ्या.

- आता मिश्रणाचा गोळा मधोमध तुपात दिसतो. बाजूचे तूप काढून घेऊन मिश्रण थाळ्यात ओता.

- जरा थंड झाल्यावर त्याचे वड्या पाडा. अशारितीने तुमचे म्हैसूरपाक तयार झाले आहेत.

(संदर्भ: पुस्तक- दिवाळी फराळ, सकाळ प्रकाशन, लेखिका-जयश्री कुबेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NavIC: आता भारतीयांना रस्ता गुगल मॅप्स नाही, तर'नाविक' सांगणार; सरकारची नेमकी योजना काय?

Narayangaon News : पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; एक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Mahadev Jankar : सरकार शक्तिपीठ महामार्गाला तरतूद करते, मात्र निवडणूक आश्वासनातील कर्जमाफीला तरतूद करत नाही

JDU Expelled Leaders: मोठी बातमी! निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाकडून ११ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, कारण काय?

ICC Womens World Cup 2025 : ठरलं! भारत सेमीफायनलमध्ये अपराजित ऑस्ट्रेलियाशी भिडणार; द. आफ्रिकेला हरवत कांगारूं पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल...

SCROLL FOR NEXT