Sanjora Esakal
फूड

Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने सांजोऱ्या कशा तयार करायच्या?

गुबगुबीत दुलईसारख्या रेशमी आणि तितक्याच चविष्ट असतात सांजोऱ्या.

सकाळ डिजिटल टीम, दिपाली सुसर

सांजोऱ्या’ हा पदार्थ प्रामुख्याने ग्रामीण भागात बनवला जातो. सांजोऱ्या म्हणजे सांज्याच्या पोळ्या. भरपूर दूध आणि गूळ घालून रव्याचा मऊसर सांजा केला जातो आणि पुरणपोळीच्या पुरणाप्रमाणे तो कणकेत भरून सांजोऱ्या करतात. मुख्य म्हणजे याचा पुरणपोळी किंवा गुळाच्या पोळीसारखा मोठ्ठा घाट पडत नाही. गुबगुबीत दुलईसारख्या रेशमी आणि तितक्याच चविष्ट असतात सांजोऱ्या. कमीत कमी साहित्यात चविष्ट फराळ रेसिपी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही सांजोऱ्या करू शकता.

आपण दिवाळी स्पेशल खास पारंपरिक पदार्थाच्या काही वेगवेगळ्या रेसिपी पाहणार आहोत त्यातील दुसरी रेसिपी आहे, दिवाळी स्पेशल पारंपरिक सांजोऱ्या कशा तयार करायच्या?

साहित्य

● दोन वाटी रवा 

● दोन वाटी बारीक केलेला गूळ 

● तूप 

● खोवलेलं ओलं खोबरं 

● वेलची पावडर 

● अर्धा लिटर दूध

● तिन वाट्या गव्हाचे पीठ

● तेल

● चवीनुसार मीठ

कृती:

सर्वप्रथम पारीसाठी दिलेले सर्व साहित्य एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून छान मऊसूत पीठ भिजवावे व झाकून ठेवावे. 

आता एका कढईत तूप व रवा एकत्र करून मध्यम आचेवर साधारणतः 10 ते 12 मिनिटे परतावे.

शिरा करताना रवा खूप भिजतो तसा जास्त लालसर भाजू नये. रवा भाजल्यावर आच मंद करावी व थोडे थोडे करत त्यात सर्व दूध घालावे. 

दूध घालत असताना सतत ढवळत रहावे म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाहीत. सर्व दूध घालून झाल्यावर कढईवर झाकण ठेवावे व एक वाफ येऊ द्यावी. 

वाफ आल्यावर त्यात गूळ व खोबरं घालावे व मंद आचेवर सांजा शिजू द्यावा. मध्ये मध्ये कालथ्याने ढवळत राहावे म्हणजे बुडाशी करपणार नाही.

संपूर्ण गुळ विरघळून छान मऊसर सांजा होऊ द्यावा. सगळ्यात शेवटी वेलची पावडर घालून छान एकजीव करावे.

तयार सांजा थंड करावा व त्याचे एकसारखे गोळे करून घ्यावेत.

हे गोळे, पुरणपोळी प्रमाणे कणकेच्या पारित भरून , गोलाकार संजोरी लाटावी व तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

Chh. Sambhajinager Crime: बहुत केस लढ रहा हैं तू; तू खतम, केस खतम, न्यायालयाबाहेर केला ग्राफिक डिझायनरवर जीवघेणा हल्ला

Neena Kulkarni : अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पुरस्कार; अभिनय, निर्मिती आणि दिग्दर्शनातील योगदानाबद्दल सन्मान

Latest Marathi News Live Update : बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी १४ ऑक्टोबरला मोर्चा काढणार

SCROLL FOR NEXT