Beetroot Kheer Recipe esakal
फूड

Beetroot Kheer Recipe: बीट खायला आवडत नाही? ट्राय करा टेस्टी आणि हेल्दी खीर

बीटापासून बनवलेल्या खीरीची चव अप्रतिम आहे आणि सगळेच ती आवडीने खातील...

सकाळ डिजिटल टीम

Recipe for Kids: बीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. बीटात आयर्न असते आणि ते आपल्या शरीरातली रक्ताची कमतरता दूर करते. पण लहान मुले असोत की मोठे, प्रत्येकजण ते खायला नकार देतात. पण फक्त चव आवडत नाही म्हणून खायला नकार देणं बरोबर नाही. 

बीट खाल्लं पाहिजे.. अशात के करावं प्रश्न पडला आहे? ट्राय करा टेस्टी बीटाची खीर. बीटापासून बनवलेल्या खीरीची चव अप्रतिम आहे आणि सगळेच ती आवडीने खातील. बघूया, बीटरूटची खीर कशी बनवायची.

साहित्य:

  • अर्धा लिटर दूध

  • दोन चमचे तूप

  • दोन चमचे ड्रायफ्रुट्स

  • एक बीट

  • अर्धी वाटी साखर

  • अर्धा चमचा वेलची पूड

  • अर्धी वाटी तांदूळ

कृती: 

  • दूध एका भांड्यात उकळण्यासाठी ठेवा. 

  • तांदूळ धुवून भिजवा. 

  • दुधाला उकळी आल्यावर तांदळाचे पाणी गाळून ते तांदूळ दुधात घाला. 

  • बीट धुवून किसून घ्या. 

  • कढई गरम करून त्यात देशी तूप घाला. 

  • बीट देशी तुपात मंद आचेवर भाजून घ्या. 

  • बीट चांगले भाजून झाल्यावर तांदूळ आणि दुधाच्या भांड्यात टाका. 

  • तांदूळ आणि बीटरूट चांगले शिजायला लागल्यावर त्यात साखर आणि वेलची पावडर घाला. 

  • थोडा वेळ शिजवा आणि घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. 

  • हव्या त्या ड्रायफ्रुट्सने सजवा आणि गरम किंवा थंड सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT