Ferrero Rocher Manchurian photo viral google
फूड

खावं तरी कसं? फेरेरो रोचर मंचुरियन पाहून नेटकरी पडले पेचात

दर आठवड्याला काहीना काही विचित्र खाण्याचे पदार्थ सोशल मीडियावर शेअर होत आहेत

सकाळ डिजिटल टीम

दर आठवड्याला काहीना काही विचित्र खाण्याचे पदार्थ (Food) सोशल मीडियावर शेअर आणि व्हायरल होत आहेत आणि ते पदार्थ पाहून नेटकरी चांगलेच वैतागत आहेत. आता हेच बघा ना गेल्या आठवड्यात रूह अफजा चहा आणि मसाला डोसा आइस्क्रीमला नेटकऱ्यांनी ट्रोल केले. हे बाकी होतं म्हणून आता फेरेरो रोचर मंचुरियन चा फोटो व्हायरल (Viral Photo) होतोय. हे तिखट गोड प्रकरण कसं लागेल, खावं तरी कसं हे, अशा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. (Ferrero Rocher Manchurian photo viral)

ट्विटरवर जोएना हिने ने नुकतेच फेरेरो रोचर मंचुरियन (Ferrero Rocher Manchurian) चे छायाचित्र शेअर केले आहे. तपकिरी मंचुरियन ग्रेव्हीमध्ये बुडवलेले सिग्नेचर फॅन्सी राऊंड फेरेरो रोशर्स, दिसायलाही ते अत्यंत वेगळे दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली. चायनिज डिशमध्ये असे ५०० रूपयांचे फेरेरो रोचर चॉकलेट घालून डिश वाया का घालवायची असाही प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. लोकांनी त्या फोटोला अत्यंत वाईट प्रतिक्रिया दिल्या असून ते चांगलेच वैतागल्याचे बघायला मिळते आहे. (Ferrero Rocher Manchurian photo viral)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT