Food Culture Sakal
फूड

खाद्यसंस्कृतीचा वारसा जपूया

Food Culture: खरचं एखादा पदार्थ इतके वर्ष कसा टिकत असावा हे कोडे सुटायचे नाही. साखरआंबा, गुळांबा, मेथांबाशिवाय उन्हाळा काढणे जरा अवघडच.

सकाळ वृत्तसेवा

पृथा वीर

Food Culture: आठवण ही अशी गोष्ट आहे, जी कधीही आणि कुठेही आपल्या सोबत असते. एकवेळ सावली साथ सोडेल. पण आठवणी नाही. बालपणीच्या आठवणींचा गोडवा तर काही औरच. ना स्पर्धा, ना टेन्शन. बस रोजचा दिवस साजरा करायचा हे ध्येय घेऊनच नवा दिवस सुरू व्हायचा. त्यातही चित्रकलेचा पेपर झाला की, उन्हाळ्याच्या सुटी लागणार म्हणून इतका आनंद व्हायचा की, या उन्हाळ्यात काय नवीन म्हणून सरांच्या सुचनांकडे अजिबात लक्ष नसायचे.

अजूनही शेतातले आंब्याचे झाड खुणवते. दगड पाडून एकेक एक कैरी पाडताना जणू काही बहुमोल हाती पडले इतका आनंद व्हायचा. वाड्यावरच्या माडीत, माजघरातल्या लाकडाच्या पेटीत गवतात ठेवलेले आंबे चोरून खाण्याची मजा तर औरच. कैरीचे पन्हे तर अत्यंत आवडीचे. चुलीवर उकळून घेतलेल्या कैरीचा खरोखर चविष्ट लागायचा.

गुळ टाकून किसलेल्या ''कैरीचा तक्कू'' तर उन्हाळ्यात ठरलेला. उन्हाळा सुद्धा खूप काही शिकवायचा. आंब्याचे लोणचे घालताना स्वच्छता, टापटीपपणा याचे नैतिक शिक्षण मिळायचे. धडे मिळायचे. हळूच कुणीतरी वीस वर्षांपूर्वी घातलेला आवळ्याचा मुरब्बा खायला द्यायचे.

खरचं एखादा पदार्थ इतके वर्ष कसा टिकत असावा हे कोडे सुटायचे नाही. साखरआंबा, गुळांबा, मेथांबाशिवाय उन्हाळा काढणे जरा अवघडच. बर चित्रकलेचा पेपर झाला की, घरी कधी जाते असे व्हायचे. घरी गेल्यानंतर आजीसोबत गच्चावर जायचे. टीनावर चढून शेवया करायच्या. आजीच्या हातच्या शेवया काही खास.

रूखवंतात ठेवण्यासाठी करतात अगदी तशाच नाजूक शेवया आजी करायची. मसूर डाळ, लवंग, गुलाबाचे फूल, काड वाती, नखोल्या अशा कितीतरी प्रकारच्या शेवया आजी करायची. लाकडाच्या काडीचा मागचा भाग स्वच्छ धुवून त्यावर अगदी बारीक वेटोळे घालून केलेल्या शेवया म्हणजे ''सरगुंडे'' करताना वेळ कसा गेला ते समजायचे नाही. या शेवया वाळल्या की, अजूनच सुरेख दिसायच्या.

गव्हाचा रवा काढून सूत काढून केलेल्या शेवयांची सर तर कशाला नाही. या किचकट शेवया एकटी-दुकटीचे काम नसायचे. म्हणूनच घरातल्या महिला एकत्र येऊनच शेवया करायच्या. तीच मजा बाजरीच्या खारोड्या,  उडदाच्या डाळीचे शेंडगे, उडीद- मुगाचे पापड, गव्हाच्या नाजूक कुरडई, ताकातल्या मिरच्या, आमसूल असे कितीतरी प्रकार व्हायचे. आजही हे पदार्थ मिळतात. पण ही खाद्यसंस्कृती आता शहरात न दिसता ग्रामीण भागापुरती मर्यादित झाली. पिढी दर पिढी आलेला हा वारसा कुठेतरी मध्येच हरवला.

म्हणूनच पापडाचे वेगवेगळे प्रकार रेस्टॉरंटमध्ये पापड प्लँटर म्हणून दिसतात. पण तेच पापड गावात अगदी सहज मिळतात. तेव्हा काही मोबाइल नव्हते. कदाचित मोबाइल असता तर त्या आठवणी कैद करता आल्या असत्या. सुदैवाने सोशल मीडियावर अशा जुन्या आणि विस्मरणात गेलेल्या पाककृती बघायला मिळतात. खाद्यसंस्कृती हा सुद्धा वारसा. एका देशातून दुसऱ्या देशात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात शेअर झालेली पाककृती म्हणजे सांस्कृतिक आदानप्रदान. मग हा अमूल्य वारसा जपायला तर हवाच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT