Turi Varan
Turi Varan  Esakal
फूड

Food: पारंपरिक तुरीचं वरण डाएट करतानाही विसरू नका; तुरीचं वरण खाण्याचे 5 फायदे

सकाळ डिजिटल टीम

आपल्या भारतीय लोकांच्या रोजच्या आहारात डाळींचं महत्व अनन्यसाधारण आहे. खासकरून ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश आहार केला जातो. अशावेळी मग सामान्य माणसांला प्रश्न पडतो की आपल्या आरोग्यासाठी कोणती डाळ महत्त्वाची त्यांचीच माहिती आज आपण पाहणार आहोत.

आहारतज्ज्ञ सांगतात की तंदुरुस्त आरोग्य ठेवण्यासाठी तुरीची डाळ खाण्याचा सल्ला देतात. तुरीची डाळ आहारात असली तर अनेक आरोग्य समस्या आणि पोषणाची कमतरता दूर होते. खरचं वजन कमी करतांना तुरीच्या दाळीची मदत होते का?

तुरीच्या डाळीमध्ये फोलिक ॲसिड, लोह, प्रथिनं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फाॅस्फरस आणि पोटॅशियम हे महत्वाचे घटक असतात. तसेच तुरीच्या डाळीत पचनासाठी महत्वाचे असे झिंक, काॅपर, सिलेनियम, मॅग्नीज हे घटक देखील असतात. तुरीच्या डाळीत प्रथिनांचं प्रमाण भरपूर असल्यानं वजन कमी करण्यासाठी तुरीच्या डाळीची मदत होते. आरोग्यदायी पध्दतीनं वजन कमी करण्यासाठी आणि शरीरास योग्य पोषण मिळण्यासाठी नियमित आहारात तुरीची डाळ असणं महत्वाचं असतं. चला तर मग आता बघू या रोजच्या सकाळच्या जेवणात तुरीची डाळ का हवी याविषयीची सविस्तर माहिती..

1) तुरीची डाळ मधुमेहाच्या समस्येतही फायदेशीर ठरते. कारण तुरीच्या डाळीत पोटॅशियम असतं. रक्तातील साखर कमी करण्यासाठी हा घटक महत्वाचा असतो. तुरीच्या डाळीतील पोटॅशियम रक्तातील साखर नियंत्रित करणारं वॅसोडिलेटरसारखं काम करतं.

2) तुरीच्या डाळीत पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असल्यानं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुरीची डाळ महत्वाची असते. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास हदयविकाराचा धोका असतो. हा धोका कमी करण्यासाठी रक्तदाब नियंत्रित करणं आवश्यक असतं. यासाठी तुरीच्या डाळीचा उपयोग होतो.

3) वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी तुरीची डाळ खूप महत्वाची आहे. तुरीच्या डाळीचा नियमित आहारात समावेश असल्यास वजन वेगानं कमी होण्यास मदत होते. तुरीच्या डाळीमुळे पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. तसेच तुरीच्या डाळीतून शरीराला आवश्यक पोषक घटकही मिळतात. तुरीच्या डाळीत असलेल्या प्रथिनांमुळे शरीरात पेशींची निर्मिती होण्यास मदत होते.

4) गरोदर महिलांसाठी तर तुरीच्या डाळीचं सेवन अतिशय फायदेशीर असतं. कारण तुरीच्या डाळीत फोलिक ॲसिड असतं. गर्भाचा विकास होण्यासाठी हा घटक अतिशय महत्वाचा असतो.

5) अन्नाचं पचन नीट होण्यासाठी फायबरला महत्व आहे. तुरीच्या डाळीत फायबरचं प्रमाण जास्त असतं. तुरीची डाळ सेवन केल्यानं पचनाच्या समस्या दूर होतात. अन्नाचं नीट पचन होवून शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी, दिवसभर उत्साह टिकून राहाण्यासाठी तुरीच्या डाळीचा उपयोग होतो.

जास्त तुरीची डाळ खाणं कोणाला अपायकारक ठरू शकत?

तुरीच्या डाळीत आरोग्यास फायदेशीर पोषक तत्वं असली तरी विशिष्ट प्रकारच्या आरोग्य समस्यांमध्ये तुरीची डाळ खाणं अपायकारक ठरतं असं तज्ञ सांगतात. ज्यांचं युरिक ॲसिड वाढलेलं असतं त्यांनी तुरीची डाळ खाऊ नये. किडनी संबंधित काही समस्या असल्यास तुरीची डाळ आहारात वर्ज्य ठरते. तुरीची डाळ रात्री न खाता सकाळच्या जेवणात खावी. रात्री तुरीची डाळ नीट पचत नाही. तसेच तुरीच्या डाळीत काही अमीनो ॲसिडसची कमतरता असल्यानं तुरीच्या डाळीसोबत पोळी किंवा भात अवश्य खावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT