food सकाळ
फूड

पावसाळ्यात गरमागरम खाण्याची इच्छा होतंय? ट्राय करा टेस्टी कोथिंबीर वडी

हिरवा गार झालेला कोवळा कोंथिबीर भाजीवाल्यांकडे दिसला की खरपूस कोंथिबीर वडी खायची इच्छा होते.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळा सुरू झाला की बाजारात कोंथिबीर अगदी स्वस्त होतो. पावसाच्या पाण्यामुळे हिरवा गार झालेला कोवळा कोंथिबीर भाजीवाल्यांकडे दिसला की खरपूस कोंथिबीर वडी खायची इच्छा होते. (food recipe check here how to make kothimbir vadi)

चला तर मग आज आपण बघूया कोथिंबीर वडी नेमकी कशी तयार करायची तर..

कोथिंबीर वडी करता लागणारे साहित्य

1) एक जुडी कोथिंबीर

2) २०० ग्रॅम बेसन पिठ

3) १०० ग्रॅम तांदळाचं पीठ

4) चार पाच हिरव्या मिरच्या

5) एक चमचा हळद

6) एक चमचा जिरं

7) लसूण पाकळ्या

8) एक चमचा तेल

9) चवीनूसार मीठ

10) तिळ

कोथिंबीर वडी तयार करायची कृती -

  • सर्वप्रथम कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.

  • नंतळ स्वच्छ धुतलेली कोथिंबीर एका ताटात घ्या. मग त्यात बेसन पीठ, तांदळाचं पीठ, तीळ, बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या, हळद, ठेचलेल्या लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि एक चमचा तेल टाकून हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून मस्त घट्ट मळून घ्या.

  • त्यानंतर तयार मिश्रणाचे छान रोल तयार करुन घ्या.

  • तयार कोथिंबीर वडीचे रोल कुकरच्या भांड्यात वाफळायला ठेवा. कुकरच्या अंदाजे ५ ते ७ शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा.

  • पुढे मग कुकर थंड झाल्यावर हळुवार झाकण उघडून वडीचे रोल बाहेर काढून घ्यावे. रोल थोडे थंड झाले की पोळपाटावर घेऊन, चाकूने त्यांच्या वड्या पाडून घ्याव्यात.

  • नंतर गॅसवर तवा गरम करुन त्यावर एक चमचा तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर त्यावर कोथिंबीर वड्या हळुवार ठेवून मध्यम आचेवर चांगल्या खरपूस भाजून घ्या. एका बाजूने वडी भाजली की तिला पलटी करून, त्यावर थोडं तेल टाकून पुन्हा ती वडी दुसऱ्या बाजुने खरपूस भाजून घ्या. नंतर गॅस बंद करा. अशारीतीने गरमागरम कोथिंबीर वडी तयार आहे.

  • तुम्ही मसाल्याच्या भाजीसोबत खरपूस कोथिंबीर वडीचा आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT