Green Veggies esakal
फूड

शाकाहार कराल तर, १३ वर्ष जास्त जगाल! संशोधनात स्पष्ट

नॉर्वेमध्ये झालेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष PLOS जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मटण खाल्ल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात तेही अभ्यासात सांगितले आहे.

शाकाहार अनेकांना आवडतोच असं नाही. अनेक लोकं मांसाहार करणं पसंत करतात. पण एका अभ्यासानुसार मटण किंवा प्रोसेस्ड मीट(Mutton)खाण्यापेक्षा तुम्ही जर रोजच्या आहारात डाळी, हिरव्या भाज्या, कडधान्ये, नट्स या गोष्टींचा (Vegetarian) समावेश करतात ते १३ वर्ष अधिक जगू शकतात.जर एखाद्या वृद्ध व्यक्तीनेही या पदार्थांचा (Food) आहारात समावेश केला तर ते ३ ते ८ वर्ष अधिक जगू शकतात असे सांगण्यात आले आहे. नॉर्वेमध्ये याबाबात संशोधन करण्यात आले.

फळं (Fruits)

अभ्यास काय सांगतो?

PLOS जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, डाएटमध्ये रेड आणि प्रोसेस्ड मीटपेक्षा मांसापेक्षा धान्य, शेंगा आणि नट्सचा आहारात समावेश केल्याने आयुष्य वाढू शकते. नॉर्वेमध्ये झालेल्या संशोधनानुसार, परदेशात राहणारे लोकआहारात फळे, हिरव्या भाज्या, शेंगा, धान्य यांचा समावेश कमी प्रमाणात करतात. त्यापेक्षा जास्त प्रमाणात प्रोसेस्ड पदार्थ, रेड मीट जास्त खातात. असे पदार्थ खाल्ल्याने मधुमेह, कॅंन्सरसारख्या अनेक आरोग्यसमस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमचे आयुष्य कमी व्हायला लागते. पण या लोकांनी जर फळे, हिरव्या भाज्या, शेंगा जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यांचे आयुष्य वाढू शकते. महत्वाचे म्हणजे, बर्गन विद्यापिठातील तज्ज्ञांना आढळून आले की, जर ६० वर्षांच्या व्यक्तीने आहारात शाकाहारी पदार्थ समाविष्ट केले तर त्यांचे आयुष्यही ८.५ वर्षांनी वाढू शकते. तसेत ८० वर्षांच्या व्यक्तींचे आयुष्य साडेतीन वर्षांनी वाढू शकते.

dryfruit

२२५ ग्रॅम तृणधान्ये, २५ ग्रॅम सुकामेवा

संशोधनात, युरोपियन आणि अमेरिकन आहारांची तुलना संगणकाद्वारे केली. यात वय आणि अन्न सेवन यांच्याशी संबंधित आरोग्य धोक्याची गणना केली गेली. संशोधकांनी सांगितले की, जर २० वर्षांची व्यक्ती कडधान्य खात नसेल तर त्याने एका दिवसात २०० ग्रॅम शेंगा, एक वाटी डाळ खाल्ली तर त्याचे आयुष्य अडीच वर्षांपर्यंत वाढू शकते. त्यांच्यामते, शेंगांमध्ये चरबी कमी प्रमाणात असते. पण प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त प्रमाणात आढळतात. म्हणून, जर आयुष्य वाढवावे असे वाटत असेल तर, दररोज सुमारे २२५ ग्रॅम कडधान्ये, ओट्स, ब्राऊन राईस त्याचबरोबर वेगवेगळे नट्स खाल्ले पाहिजेत.

Meat

रेड आणि प्रोसेस्ड मीट खाणे बंद करा

तज्ज्ञांनी सांगितले की, रेड आणि प्रोसेस्ड मीट खाणे बंद केले पाहिजे. त्यात फॅट्स आणि सोडीयम जास्त प्रमाणात असते. जर तुम्ही हे खाणं बंद केलंत तर चार वर्ष जास्त आयुष्य वाढू शकतं. या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि पोषण तज्ञ प्रोफेसर लार्स फॅडनेस (Lars Fadnes) यांनी सांगितले की, आहाराची गणना केल्याने लोकांना चांगले खाण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT