Gatari Amavasya 2023 esakal
फूड

Gatari Amavasya 2023 : गटारी स्पेशल घरच्या घरी तयार करा 'पॅन तंदुरी चिकन'

आषाढाच्या शेवटच्या दिवशी मांसाहारावर मनसोक्त ताव मारून घेतात आणि गटारी साजरी करतात.

सकाळ डिजिटल टीम

श्रावण म्हणजे सणांचा, व्रत-वैकल्यांचा महिना !

म्हणूनच या महिन्यामध्ये अनेक जण मांसाहार करत नाहीत. त्यामुळे, हा श्रावण महिना पाळणारे मांसाहारप्रेमी तो सुरु होण्यापूर्वी म्हणजेच आषाढाच्या शेवटच्या दिवशी मांसाहारावर मनसोक्त ताव मारून घेतात आणि गटारी साजरी करतात. या दिवसाला आषाढ अमावस्या किंवा गटारी अमावस्या असंही म्हटलं जातं.

तेव्हा आज गटारी स्पेशल पॅन तंदुरी चिकनची रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य :

1) एक किलो चिकन

2) 200 ग्रॅम दही

3) मोठा चमचा बटर

4) एक चमचा हळद

5) दोन मोठे चमचे लिंबाचा रस

6) दोन मोठे चमचे लाल तिखट

7) अर्धा चमचा गरम मसाला

8) अर्धा चमचा गोडा मसाला

9) गरजेनुसार नुसार मीठ

10) आले-लसूण पेस्ट

11) दोन मोठे चमचे तेल (food)

कृती:

सर्वप्रथम धारदार चाकुच्या सहाय्याने चिकनच्या तुकड्यांवर थोड्या चिरा पाडा. या तुकड्यांना मीठ व हळद लावा. 15 मिनिटांकरीता ते बाजूला ठेवा. (Gatari Amavasya)

एका भांड्यात मध्ये इतर सर्व साहित्य एकत्र करुन घ्या. 15 मिनिटे बाजुला ठेवलेल्या चिकनच्या तुकडावर हे मिश्रण लावा. पुढे मग लोखंडी तव्यावर तेल गरम करा व त्यांत हे चिकनचे तुकडयांची एकाच थरात चांगली मांडणी करा.

मोठ्या गॅस ठेवून हे तुकडे सर्व बाजूंनी सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्या. थोडा वेळात चिकनमधील तेला मिठामुळे सुटलेला रस्सा आटून जाईल.

चिकनमधील रस्सा आटल्यावर गॅसची आच मंद करा. तव्यावर झाकण ठेवा. 15 मिनिटे किंवा चिकन चांगले शिजेपर्यंत हे झाकण राहू द्या. झाकण काढून चिकनवर बटरच टाका.
अशा रितीने गटारी स्पेशल पॅन तंदुरी चिकन तयार झालेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT