Gauri Naivedya 2025  Sakal
फूड

Gauri Naivedya 2025 : पुरणाच्या पोळ्यांना लागतो जास्त वेळ, मग गौराईसाठी बनवा खुसखुशीत सांज्याच्या पोळ्या 

Suji sweet recipe suji poli for gauri naivedya : सर्व गोष्टी इंस्टंट बनवणाऱ्या गृहिणींना पोळ्या बनवणं तसं वेळखाऊ काम वाटतं. त्यामुळेच, गौराईसाठी सांज्याच्या पोळ्या बनवू शकता.

सकाळ डिजिटल टीम

गौराईच्या आगमनानंतर गोडाधोडाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. पुरणाच्या पोळ्या बनवण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे गृहिणींना सांज्याच्या पोळ्या बनवण्याचा पर्याय आहे. या पोळ्या खुसखुशीत आणि चविष्ट असतात. रवा, गूळ, साखर, वेलदोडा, कणीक आणि मैदा वापरून या पोळ्या तयार केल्या जातात.

Gauri Avahan And Pujan: तीन दिवसांपूर्वी गणेशाचे अन् उद्या वाजत-गाजत गौराईचे आगमन होणार आहे. गौराई सोन्याच्या पावली आपल्या घरी येतात. त्या सुख समाधान देऊन जातात. गृहिणींना सौभाग्याचा आशिर्वा देऊन जातात. त्यामुळेच गौराईसाठी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. गौरी पूजनादिवशी पूरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पण पुराणाच्या पोळ्या बनवण्यासाठी वेळ लागतो. सध्या सर्व गोष्टी इंस्टंट बनवणाऱ्या गृहिणींना पोळ्या बनवणं तसं वेळखाऊ काम वाटतं. त्यामुळेच, गौराईसाठी सांज्याच्या पोळ्या बनवू शकता. (Gauri Ganapati 2025)

लागणारे साहित्य-

१ वाटीभर जाड रखा

१ वाटी गूळ

अर्धी वाटी साखर

२ वाट्या पाणी

७,८ वेलदोड्यांची पूड

अर्धी वाटी रिफाईंड तेल

२ वाट्या कणीक

अर्धी वाटी मैदा

चिमूटभर मीठ

पाव वाटी तेल

तांदळाची पिठी

कृती :

जाड रवा रिफाईंड तेलात खमंग भाजून घ्यावा. २ वाट्या पाणी, एक वाटी गूळ व अर्धी वाटी साखर घालून उकळून घ्यावे.

भाजलेल्या रव्यावर गूळ साखरेचे पाणी घालून ढवळावे व मंद आचेवर दोन वाफा घेऊन सांजा शिजवून घ्यावा. त्यात वेलदोड्याची पूड घालून गार करायला ठेवावा.

कणीक व मैदा चाळायच्या चाळणीने चाळून चिमूटभर मीठ घालून पाव वाटी तेलातले अर्धे तेल घालून भिजवावी.

२ तास कणीक भिजल्यावर पाणी व तेलाचा वापर करून सैलसर तिंबावी (पुरणपोळीच्या कणकेप्रमाणे)

कणकेचा लिंबाएवढा गोळा पिठीच्या साहाय्याने हातावर पसरून त्यात कणकेच्या दुप्पट सांजा हळूहळू भरून उंड्याचे तोंड बंद करावे.

पोळपाटावर तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने पोळी लाटावी व सपाट तव्यावर दोन्ही बाजूंनी गुलाबी भाजावी. अशा रीतीने सर्व पोळ्या कराव्यात.

महत्त्वाची टीप :

 रवा शक्यतो गव्हाच्या रंगाचा घ्यावा. नेहमीचा पांढरट रवा घेऊ नये. सांजा करताना रवा खरपूस भाजावा. रवा भाजताना थोड्या कमी तेलावर भाजावा, नाहीतर सांजा चिकट होऊन पोळीत नीट भरता येत नाही.

कणीक सैल नसेल तर पोळ्या चिवट होतात. रवा रिफाईंड तेलात भाजावा. वनस्पती तूपात भाजला तर थंड झाल्यावर तूप थिजून सांजा घट्ट होतो व पोळी नीट लाटली न जाता काठ राहतात.

सांजा कोरडा वाटला तर दूधाचा हात लावून मऊसूत करून घ्यावा. वरील साहित्यात ८ ते १० मध्यम आकाराच्या पोळ्या होतात. या पोळ्या ४ माणसांना पुरतात.

( संबंधित रेसिपी सौ.जयश्री देशपांडे यांच्या हमखास पाककृती या पुस्तकातून घेण्यात आली आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Factory Gas Leak: फूड फॅक्टरीत अमोनिया गॅस गळतीचा भीषण कहर! ७ महिला कामगारांचा मृत्यू, ६७ लोकांची प्रकृती गंभीर, चौकशीचे आदेश

Latest Marathi News Live Update : पुण्यासह देशभरात आज नीट परीक्षा पार पडल्या, परीक्षा केंद्रावर गोंधळ नाही

Fathers Day Health Alert: फादर्स डे २०२६ ; आजचा पिता शांतपणे तणाव सहन करतोय, उच्च रक्तदाब ठरतोय मोठा आरोग्याचा धोका

Tech Tips : कुणीतरी गुपचुप तुमच्या चॅट किंवा फोटोचा स्क्रीनशॉट घेतय? ओळखायची खतरनाक ट्रिक, 90% लोकांना नाही माहिती

Education Policy: संशोधन-विकासात आत्मनिर्भरतेशिवाय प्रगती नाही; सीओईपी स्थापना दिनी लीला पूनावालांचे आवाहन

SCROLL FOR NEXT