Ginger In Tea Sakal
फूड

Ginger In Tea : फक्कड चहासाठी नेमकं आलं टाकायचं कधी? पाणी गरम झाल्यावर की, उकळी आल्यावर

भारतातील प्रत्येक कोपऱ्यात चहाच्या विविध चवी आणि बनवण्याच्या पद्धती पाहण्यास मिळतील.

सकाळ डिजिटल टीम

What Is Right Time To Add Ginger In Tea : भारतीय लोक पाण्यानंतर सर्वाधिक पेय पित असतील तर ते म्हणेज चहा आहे. भारतातील प्रत्येक कोपऱ्यात चहाच्या विविध चवी आणि बनवण्याच्या पद्धती पाहण्यास मिळतील.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

सध्या थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. या थंड वातावरणात गरमागरम चहाचे महत्त्व अधिक वाढते. त्यात जर, चहा अगदी फक्कड बनला असेल तर, त्याची मजा काही औरच. अनेक घरांमध्ये थंडीच्या दिवसात चहाची चव वाढवण्यासाठी चहात आलं टाकलं जात. मात्र, अनेकांना चहात नेमकं आलं कधी टाकायचं चहा उकळल्यावर की दूध टाकल्यावर हे माहिती नसते. त्यामुळे चहाची चव बिघण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला चहात नेमकं आलं कधी टाकयचं याबद्दल सांगणार आहोत.

थंडीत आल्याचा चहा पिण्याची मजा काही औरच असते. आल्याचा चहा फक्त थकवाच दूर करत नाही तर, काही वेळा ऑफिसमध्ये बसल्या बसल्या डोकेदुखी थांबण्यासही मदतगार ठरतो.

चहा

कुटून टाका आलं

अनेकजण चहाची चव वाढवण्यासाठी किसलेले आले टाकण्याऐवजी ते कुटून टाकतात. मात्र, असे केल्याने आल्याचा रस चहामध्ये उतरण्याऐवजी भांड्यातच राहतो. त्यामुळे चहाची चव वाढत नाही. तसेच यामुळे चहाचा रंगही बदलतो.

किसून टाका आलं

चहाची चव वाढवण्यासाठी किसलेले आले टाकावे. यामुळे आल्याचा रस थेट चहामध्ये जातो आणि चहा चवदार आणि कडक बनतो. किसलेले आले घातल्याने चहाची चव तर वाढतेच पण त्याचा रंगही बदलतो.

चहात आलं केव्हा टाकावं?

तुम्ही चहामध्ये आलं कधी टाकता यावर चहाची चव अवलंबून असते. फक्कड चहासाठी नेहमी आलं दूध, चहा पावडर तसेच साखर टाकल्यानंतरच टाकावे. कडक चहासाठी नेहमी आलं चहाला उकळी आल्यानंतर घालावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andekar Gang: कशी सुरू झाली आंदेकर टोळीची दहशत? भांड्याचा व्यवसाय ते अंडरवर्ल्ड कनेक्शन! ४ पिढ्यांचा पडद्यामागचा काळा इतिहास

Mill Workers: गिरणी कामगार पुन्हा आक्रमक, हक्काच्या घरासाठी आंदोलन छेडणार

WhatsApp Services : नेट स्लो नाहीतर, व्हॉट्सअ‍ॅप डाऊन...! स्क्रोलिंग करताना अडचण येतीय? मग 'ही' ट्रीक वापरा

Latest Marathi News Updates:विसर्जन मिरवणुकीदरम्यान नाचण्यावरुन वाद, एका तरुणाचा खून

3D Photo Prompt : फ्रीमध्ये तुमचे '3D स्टाईल' (थ्री डी) फोटो बनवा, एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT