Green chilli thecha recipe Esakal
फूड

Green chilli thecha recipe: महाराष्ट्रीयन पद्धतीने झनझनीत हिरव्या मिरचीचा ठेचा कसा तयार करायचा ?

गावाकडे जर भाजी तयार नसेल तर भाजीला उत्तम पर्याय म्हणजे ठेचा असतोच.

सकाळ डिजिटल टीम

गावाकडे जर भाजी तयार नसेल तर भाजीला उत्तम पर्याय म्हणजे ठेचा असतोच.त्यामुळे गावातील प्रत्येकाला आजही हिरवी मिरची ठेचा हा आपलासा वाटतो.

हिरव्या मिरचीचा ठेचा हा खायला खूपच भारी लागतो. याची चव बराच वेळ जिभेवर रेंगाळत राहते आणि तिखटपणा म्हणजे चटका आठवणीत राहतो.

चला तर मग आज जाणून घेऊया या हिरव्या मिरचीची ठेचा कसा करायचा याची रेसिपी.

साहित्य :

1) अर्धा पाव हिरवी मिरची

2) अर्धा वाटी शेंगदाणे

3) लसूण

4) तेल

5) जीरे

6) मीठ

7) लिंबाचा रस

कृती:

सर्वप्रथम पहिले हिरव्या मिरच्यांचे देठ काढून त्या स्वच्छ पाण्याने धुवून घाव्या.नंतर त्या धुतलेल्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घ्यावे.त्यानंतर एका लोखंडी कढईत तेल गरम करावे. तेल गरम झाले की हिरव्या मिरची बारीक केलेले तुकडे निट भाजून घ्यावे. नंतर लसूण आणि शेंगदाणे देखील चांगले खरपूस भाजून घ्यावे.

भाजलेल्या मिरच्या आणि शेंगदाणे लसूण नीट मिक्स करावे. हे मिश्रण थंड झाल्यावर खलबत्त्यात ठेचा (खलबत्त्यात ठेचून केला जातो म्हणूनच याला ठेचा म्हणतात) याचा तिखटपणा कमी करण्यासाठी वरून लिंबाचा रस घालावा. आपला हा हिरव्या मिरचीचा ठेचा तयार आहे.

तुम्ही हा ठेचा गरमागरम भाकरी ,पोळीसोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT