coffee making esakal
फूड

प्रेशर कुकरमध्ये केली कॉफी, ग्वाल्हेरच्या माणसाचा व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

फ्रेश क्रिम कॉफीसह जे दिवसाची सुरूवात करतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे.कॉफीची खरी जादू त्यातच दडलेली आहे. पण तेच कसब आपण घरी वापरताना अडचणी येतात. पण, एक कॉफी विक्रेता आहे जो अशी क्रिमी कॉफी प्रेशर कुकरवर बनवतो. इंस्टाग्रामवर याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ग्वाल्हेरचा एक स्ट्रीट विक्रेता सायकलवर कॉफी विकत आहे आणि कॉफी बनवण्यासाठी प्रेशर कुकर वापरतो. या व्हिडिओला २.४ लाख लोकांनी पाहिला आहे.

व्हिडिओमध्ये एक वृद्ध माणूस सायकलवर कॉफी विकताना दिसत आहे. कॉफी बनवण्यासाठी तो एका स्टीलच्या भांड्यात दूध, कॉफी आणि साखर घालतो. मग तो फोम तयार करण्यासाठी बरणी त्याच्या जवळ घेतो तिथे तो प्रेशर कुकर वापरून प्रेशर तयार करतो आणि कॉफीमध्ये फ्रॉथ आणि टेक्सचर घालतो.

त्याची कॉफी बनवण्याची नाविन्यपूर्ण पद्धत अनेकांना आवडली आहे. अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. एका यूजरच्या म्हणण्यानुसार, "या माणसाच्या साधेपणाला सलाम, देव तुमचे भले करो सर." अनेक लोकांनी त्याच्या हातची कॉफी प्यायची असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing Time: SEBI चा मोठा निर्णय! शेअर बाजाराचा क्लोजिंग टाइम बदलला; आता कोणत्या पद्धतीने बंद होणार, काय बदललं?

UKSSSC पेपर लीक प्रकरणात EDची मोठी कारवाई; मुख्य आरोपीची 63 लाखांची मालमत्ता जप्त

ना सातारा, ना कोल्हापूर; कुठे सुरू आहे स्टार प्रवाहची नवी मालिका 'लाडक्या नाईक बाईं'चं शूटिंग? ऐश्वर्या नारकरांनी दाखवला सेट

Mumbai News: बदलत्या मुंबईतही टिकला १२८ वर्षांचा वारसा, १८९८ मध्ये सुरू झालेल्या किराणा दुकानाची चौथी पिढी सांभाळतेय धुरा

Latest Marathi News Live Update : २३ व्या फेरीनंतर प्रशांत किशोर १३२६९ मतांनी आघाडीवर, विजय जवळपास निश्चित

SCROLL FOR NEXT