Besan halwa Recipe 
फूड

Halwa Recipe : रव्याचा शिरा नेहमीच खातात, पण कधी बेसनाचा शिरा ट्राय केलात का? जाणून घ्या रेसिपी

Besan halwa Recipe: आतापर्यंत तुम्ही रव्याचा शिरा बरेचदा खाल्लाच असेल. पण कधी तुम्ही रव्याबेसनाचा शिरा ट्राय केला आहे काय?

साक्षी राऊत

Sooji Besan Halwa Recipe : सणांचे दिवस सुरु झालेत की घरी काहीतरी गोड पदार्थ हे बनतातच. इतरही वेळी शुभप्रसंगी घरात खमंग सुवास परसवणारा पदार्थ म्हणजे शिरा.

शिवा बनवण्यासाठी निमित्त नाही तर काही वेळा कुटुंबाचं आनंदी असणंसुद्धा पुरेसं ठरतं. काही कुटुंबात पाहुण्यांसाठी सुद्धा घरी खास शिरा बनतो.

आतापर्यंत तुम्ही रव्याचा शिरा बरेचदा खाल्लाच असेल. पण कधी तुम्ही रव्याबेसनाचा शिरा ट्राय केला आहे काय? आज आपण अशीच एक हटके शिऱ्याची रेसिपी जाणून घेऊया.

बेसन हलवा बनवण्यासाठी साहित्य

  • 1 कप बेसन

  • 1 कप रवा

  • 1 कप दूध

  • २ कप पाणी

  • १ वाटी तूप

  • २ कप साखर

  • तुमचे आवडते ड्राय फ्रूट्स

बेसन हलवा रेसिपी (Besan Halwa Recipe in Marathi)

  • सर्व प्रथम एका जाड तळाच्या पॅनमध्ये थोडे तूप टाका.

  • आवश्यक प्रमाणात रवा आणि बेसन घालून मंद आचेवर भाजायला सुरुवात करा.

  • थोडं भाजायला लागल्यावर त्यात एक वाटी तूप टाका.

  • आता मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजा.

  • बेसन भाजल्यानंतर त्याला खमंग सुगंध येऊ लागला की त्यात दूध घालावे.

  • सतत ढवळत राहा आणि गॅसची आच अगदी मंद ठेवा.

  • या मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. (Food)

  • दूध चांगले मिक्स झाले की त्यात एक कप पाणी घाला.

  • पाणी चांगले मुरल्यावर पुन्हा एक कप पाणी घाला.

  • मंद गॅसवर चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहा.

  • शेवटी साखर घाला. (Recipe)

  • साखर गरम झाल्यावर साखरेचा पाक होईल आणि बेसन बरोबर चांगले भाजले जाईल.

त्यानंतर तुमचा रव्याबेसनाचा शिरा तयार आहे. ही डिश तुम्हाला हव्या त्या ड्रायफ्रुट्सने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा. अगदी टेस्टी आणि पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल अशी ही डिश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bernard Julien Passes Away : वर्ल्ड कप विजेत्या अष्टपैलू खेळाडूचे निधन; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या डोक्याचा वाढवलेला ताप

पूरग्रस्त भागाचा दौऱ्यावेळी भाजप खासदार-आमदारावर हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू

Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

Latest Marathi News Live Update : अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात नव्हती, पुणे पोलिसांच्या तपासातून अंतिम माहिती

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT