beetroot benefits  Esakal
फूड

Cholesterol Problem आहे? मग आहारामध्ये नक्की करा बीटचा समावेश, बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या होईल दूर

beetroot for lowering cholesterol: कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांनी आहारात नियमितपणे बीटच्या ज्यूसचं सेवन केल्यास रक्तातील बॅट कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर टाकण्यास मदत होईल आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.

Kirti Wadkar

Beetroot for cholesterol control: कोलेस्ट्रॉल ही सध्या वाढत जाणारी समस्या आहे. रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल Bad Cholesterol वाढल्यास हृदयाच्या अनेक आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते.

अलिकडे चुकीच्या जीवनशैलीमुळे lifestyle आणि चुकीच्या आहारामुळे शरीरामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. Health Tips Marathi Beetroot to reduce bad cholesterol

तळलेले, प्रिझर्व्हेटीव असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. जंक फूड Junk Food तसंच तळलेले हे सर्व पदार्थ शरीरातील रक्त वाहिन्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल (low-density lipoprotein) म्हणजेच लिपिड प्रोफाइल कोलेस्ट्रॉल LDL वाढवण्याचं काम करत असतात.

जंकफूड किंवा तेलकट पदार्थांमधून निघणारे फॅट्स Fats हे रक्तवाहिन्यांमध्ये दीर्घ काळासाठी चिटकून बसतात आणि यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होण्याचा धोका वाढतो. यासाठी हे LDL रक्त वाहिन्यांमध्ये चिटकून राहणार नाही यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

यासाठीच तुम्ही आहारामध्ये बीटचा Beetroot समावेश करू शकता. बीटचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. बीटामध्ये नायट्रिक ऍसिड मोठ्या प्रमाणात आढळतं.

त्याचप्रमाणे यात फायबर आणि अनेक हेल्दी अँटीऑक्सिडंट्स आढळतात. ज्यामुळे स्वादूपिंडातील पेशी सक्रिय होण्यास मदत होते तसंच रक्तातील साखरेची चयापचय क्रिया जलद होते. त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील बीटचं सेवन उपयुक्त ठरतं.

हे देखिल वाचा-

फॅट लिपिड दूर करण्यासाठी- बीटमध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरातील लिपीड बाहेर पडण्यास मदत होते. हे फायबर रक्तातील फॅट लिपिडमध्ये मिसळतं आणि ते हे लिपिड आपल्यासोबत घेऊन शरीराबाहेर पडतं. तसंच यातील रफेज फॅट मेटोबोलिज्म जलद करून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राखण्यास मदत करतं.

रक्त वाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर- बीटरूट रक्तवाहिन्या निरोगी ठेवतं आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतं. यामुळे प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि लिपिड याचं शरीरामध्ये संतुलन राखण्यास मद होते. तसंच रक्त वाहिन्याचं कार्य सुरळीत चालतं.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी- बीट हे हृदय निरेगी ठेवण्यासाठी देखील उपयुक्त छरतं. बीटाच्या सेवनामुळे लाल पेशी वाढून रक्त वाढण्यास मदत होते. तसंच रक्त डिटॉक्स म्हणजेच रक्त शुद्धीकरणाचं काम करण्यास बीटातील घटक उपयुक्त ठरतात.

कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांनी आहारात नियमितपणे बीटच्या ज्यूसचं सेवन केल्यास रक्तातील बॅट कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर टाकण्यास मदत होईल आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.

असा तयार करा बीट ज्यूस beetroot juice

  • बीट ज्यूस बनवण्यासाठी एक बीट, अर्ध , सफरचंद, एक गाजर आणि एक टोमॅटो स्वच्छ धुवावे.

  • त्यानंतर बीटाची साल काढून बीटासह सफरचंद, गाजर आणि टोमॅटोचे तुकडे करावे. हे तुकडे एका मिक्सरच्या भांड्यात टाकावे.

  • यात एक लहान आल्याचा तुकडा, अर्धा चमचा जीरं आणि थोड मीठ टाकावं.

  • यात एक ते दीड ग्लास पाणी टाकून मिक्सर सुरू करावं. ३-४ मिनिटांसाठी चांगलं ग्राइंड करावं.

  • त्यानंतर हा ज्यूस एका भांड्यात गाळणीच्या मदतीने चांगला गाळून घ्यावा.

  • या ज्यूसमध्ये हवं असल्यास तुम्ही थोडा चाट मसाला टाकून ज्यूसचं सेवन करू शकता.

या हेल्दी आणि टेस्टी ज्यूसचं नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची समस्या तर दूर होईलच शिवाय तुम्हाला आरोग्याचे इतरही फायदे होतील. याचसोबच तुम्ही आहारामध्ये बीटाची भाजी किंवा बीट सलाडचाही समावेश करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT