Healthy Breakfast Recipe esakal
फूड

Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा हेल्दी आणि टेस्टी मूगडाळीचा उत्तप्पा, सोपी आहे रेसिपी

मूगडाळीपासून बनवला जाणारा हा हेल्दी उत्तप्पा नाश्त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Healthy Breakfast Recipe : सकाळचा नाश्ता हा अनेकदा गडबडीत केला जातो. पोहे, उपीट, इडली आणि ब्रेडचे नेहमीचे पदार्थ खाऊन अनेकांना कंटाळा येतो. अशावेळी मग काहीतरी हेल्दी आणि झटपट होणारा नाश्ता केला तर पोट ही भरते आणि शरीराला पोषकघटक ही मिळतात.

आज आपण अशाच प्रकारची एक हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी पाहणार आहोत. ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये आरामामध्ये बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात ही मूगडाळ उत्तप्पाची हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्ट रेसिपी.

मूगडाळीचा उत्तप्पा बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • हिरवी मूग डाळ १ कप

  • अर्धा कप रवा

  • अर्धा कप दही

  • कांदा (बारीक चिरलेला)

  • टोमॅटो (बारीक चिरलेला)

  • कोथिंबीर

  • हिरव्या मिरच्या ४-५

  • अर्धी वाटी गाजर

  • चवीनुसार मीठ

  • तेल किंवा तूप

मूगडाळीचा उत्तप्पा बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • मूगडाळीचा उत्तप्पा बनवण्यासाठी सर्वात आधी मूगडाळ स्वच्छ धुवून घ्या.

  • मूगडाळ धुतल्यानंतर ती उकळण्यासाठी गॅसवर ठेवा.

  • मूगडाळ उकळल्यानंतर मूगडाळ मिक्सरला बारीक वाटून घ्या.

  • आता बारीक वाटलेल्या मूगडाळीमध्ये रवा, दही मिक्स करून घ्या

  • आता या मिश्रणात बारीक वाटलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला.

  • हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या, नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घाला.

  • आता तुमचे मूगडाळीच्या उत्तप्प्याचे बॅटर तयार आहे.

  • आता खोलगट पॅनमध्ये तेल किंवा तूप घालून ते गॅसवर ठेवा.

  • आता पॅन किंवा डोसा तव्यावर उत्तप्प्याचे पीठ पसरवा.

  • तुम्हाला हवे असल्यास त्यात विविध प्रकारच्या बारीक चिरलेल्या भाज्याही तुम्ही वरून घालू शकता.

  • आता उत्तप्पा दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.

  • आता तुमचा गरमागरम मूगडाळीचा उत्तप्पा तयार आहे. हा उत्तप्पा गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT