Healthy Moong Dal Chaat Recipe for Morning Breakfast  
फूड

Healthy Morning Breakfast Recipe : स्लिम आणि फिट राहायच आहे? मूग डाळ चाट नक्की ट्राय करा! लगेच लिहून घ्या रेसिपी

Moong Dal Chaat Recipe For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय असलेलं आणि फायबर व प्रोटीनयुक्त मूग डाळ चाट तुम्ही बनवू शकता. लगेच रेसिपी लिहून घ्या.

Anushka Tapshalkar

Healthy Moong Dal Recipe: मूग डाळ ही प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे. मूग डाळीचे कोणतेही पदार्थ खाल्ले तरी आपला पोट जास्त काळासाठी भरलेलं राहतं, ज्यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत नाही. याचा परिणाम म्हणजे तुम्ही प्रमाणात जेवण करता आणि वजन नियंत्रित राहायला मदत होते.

अशीच एक मूग डाळीच्या चाटची रेसिपी पुढे दिली आहे, ज्यामुळे तुमची वेट-लॉस जर्नी सुरळीत होऊ शकते. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोपी, पौष्टिक आणि सगळेजण आवडीने खातील अशी ही रेसिपी लगेच लिहून घ्या.

मूग डाळ चाट बनवण्यासाठीचे साहित्य

मूग डाळ, पाणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची,बारीक चिरलेला टोमॅटो, बारिक चिरलेली काकडी, कोथिंबीर, कैरी (पर्यायी), डाळिंबाचे दाणे (पर्यायी), शेव, लिंबू, मीठ आणि मिरपूड

मूग डाळ चाट बनवण्याची कृती

सर्वात आधी मूग डाळ धुवून घ्या. नंतर एका भांड्यात डाळ भिजेल एवढे पाणी घेऊन पाच तास किंवा रात्रभर डाळ भिजत ठेवा. आता भिजवलेली मूग डाळ १५ मिनिट वाफवून घ्या. तोपर्यंत एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, कैरी आणि डाळिंबाचे दाणे घाला. त्यात आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी मिरपूड घाला. नंतर त्यात वाफवलेली मूग डाळ घालून सगळं एकत्र करून घ्या. तयार झालेलं हे चाट एका प्लेटमध्ये घेऊन त्यावर शेव घाला आणि लिंबू पिळा आणि या चविष्ट अन पौष्टिक मूग डाळ चाटचा आस्वाद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT