Kuthlach-Madag 
फूड

हेल्दी रेसिपी : कुळथाचं माडगं

शिल्पा परांडेकर

मी विस्मरणात गेलेल्या पदार्थांच्या शोधात बाहेर पडले, तेव्हा ग्रामीण जीवन, पदार्थ व जुनी धान्यांबाबत अनभिज्ञ होते. आजची कुळथाची रेसिपी ही अशीच. पश्चिम महराष्ट्रातील कोणत्याही गावात गेल्यावर जुने पदार्थ सांगण्याची सुरुवात या पदार्थापासून होते. एका गावात हा पदार्थ पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने, म्हणजे जात्यावर दळून, चुलीवर शिजवून मला खाऊ घातला होता. तो पदार्थ म्हणजे कुळथाचं माडगं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुळीथ किंवा हुलगे जुन्या कडधान्यांपैकी महत्त्वाचे. आयुर्वेद आणि पारंपारिक खाद्यसंस्कृतीतही तितकेच महत्त्वाचे. कुळीथ उष्णता वाढवणारे व ताकद देणारे आहे. कुळीथामुळे कफ, वात व मेद कमी होतो. आयुर्वेदात आजारी व्यक्तीस कुळथाचे कढण देण्याचे सुचविले आहे. पूर्वी घराघरांत माडगेदेखील याचसाठी प्यायचे. पावसात भिजल्यावर कणकण, सर्दी-पडसे झाल्यावर गावातील आजी सांगायच्या, ‘‘पावसात भिजल्यानंतर कणकण आल्यास वाडगाभर गरमागरम माडगं प्यायचं अन् कांबळ पांघरून झोपायचं. तासाभरानं अंगाला दरदरून घाम सुटूनच्यान माणूस लगीचच तरतरीत व्हतुया.’’ पूर्वी पावसाळ्यातील लावणीची कामे झाल्यानंतर काहीतरी गरम पेय प्यावेसे वाटे, त्यावेळेसही माडगं केले जात असे.

कुळीथामध्ये शरीरात उष्णता निर्माण करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे थंड वातावरणात कुळथाचे सेवन लाभदायक असते. कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्यायल्याने मूतखडा घालवण्यास मदत होते. मूळव्याध, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, कावीळ अशा आजारांमध्ये कुळथाचे सेवन उपयुक्त असते. कुळथामध्ये प्रथिने, कर्बोदके, तंतुमय पदार्थ, कॅल्शियम, लोह व सूक्ष्म पोषक घटक असतात. थंडीत, तसेच मेद कमी करण्यासाठी कुळथाचे उटणे लावणे उपयुक्त ठरते. कुळथापासून उसळ, शेंगोळे, पिठी, फुणके, मुटके, लाडू, माडगं हे पदार्थ बनतात. 
आज पाहणार आहोत माडग्याची रेसिपी.

साहित्य -
कुळीथ, शेवया किंवा शिजलेला भात, गूळ, मीठ, पाणी.

कृती -

  • कुळीथ भाजून दळून घेणे.
  • पीठ थोडावेळ पाण्यात भिजवणे.
  • गुळाच्या आधणात पीठ हळूहळू सोडणे.
  • शिजत असतानाच मीठ, भात किंवा शेवया घालणे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT