Healthy Sprout recipe esakal
फूड

Healthy Sprout Chaat recipe : चटपटीत चव अन् खायला पौष्टिक, १० मिनिटांत तयार होणारी नाश्ता रेसिपी

आज आपण अगदी १० मिनिटांत तयारी होणारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी हेल्दी नाश्ता रेसिपी जाणून घेणार आहोत

सकाळ ऑनलाईन टीम

Healthy Sprout recipe : सकाळी सकाळी चटपटीत नाश्ता करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. रोज पोहे, उपीट आणि पराठे खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर आज आपण अगदी १० मिनिटांत तयारी होणारी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरणारी हेल्दी नाश्ता रेसिपी जाणून घेणार आहोत.

आज आपण स्प्राउट चाटची रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला खालील साहित्य लागेल.

  • १ कप उकळलेली किंवा मोड आलेली मिक्स कडधान्ये

  • पाण्यात भिजवलेले किंवा उकळलेले शेंगदाणे पाव कप

  • टोमॅटो, कांदा पाव- पाव कप

  • डाळिंबाचे दाणे पाव कप

  • दोन टेबलस्पून बारिक चिरलेली कोथिंबीर

  • १ टी स्पून लिंबाचा रस

  • १ टी स्पून रॉक सॉल्ट किंवा काळे मीठ

  • चवीनुसार मीठ आणि तिखट

  • १ टीस्पून चाट मसाला

असे बनवा स्प्राऊट चाट

  • ज्यांना मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्ल्याने त्रास होत नाही, त्यांनी ती कच्चीच खावीत. ज्यांना त्रास होतो त्यांनी ती उकडून घ्यावीत.

  • कडधान्ये, टोमॅटो, कांदा एका बाऊलमध्ये टाकावा.

  • त्यात इतर मसाले, मीठ टाकावे

  • त्यानंतर त्यावर लिंबाचा रस टाकावा व नंतर कोथिंबीर टाकून सगळे मिश्रण हलवून घ्यावे.

  • हेल्दी स्प्राऊट चाट रेसिपी तयार. (Breakfast)

कडधान्यांमध्ये भरपूर पौष्टिक घटक असतात तेव्हा त्यामुळे तुम्हाला एनर्जीही मिळेल आणि तुनची इम्युनिटीही वाढेल. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ही सगळ्यात हेल्दी आणि चवदार नाश्ता रेसिपी ठरेल. (Healthy Recipe)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT