homemade Beneficial to health Mushroom soup tips food marathi news 
फूड

आरोग्याला फायदेशीर मशरूम सुप कसं बनवायचं?

प्रमोद सरवले

औरंगाबाद: शरीराला आरोग्यादायी असणारं मशरूमचं सूप सर्दी झाल्यावर तसेच पावसाळ्यातही एक चांगला पर्याय म्हणून पाहिला जातो. विशेष म्हणजे हे सूप तुम्ही कोणत्याही ऋतुमध्ये घेऊ शकता. हे सुप कमी वेळात बनवता येतं. 

सूपसाठी कोणत्या प्रकारचे मशरूम सर्वोत्तम?
आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही मशरूमची निवड करू शकता. तसेच आपण ताजे तपकिरी, क्रिमीनी किंवा मिनी पोर्टेबेलो मशरूम वापरू शकता, हे या कृतीसाठी योग्य आहेत.

साहित्य
1 चमचा तेल, 10 मशरूम, मध्यम आकाराचा चिरलेला 1 कांदा,
1 वेजेटेबल स्टॉक क्यूब (600 मि.ली. उकळलेल्या पाण्यात मिसळलेला), 425 मिली लो फॅट दूध, मीठ चवीनुसार

कृती-
एक सॉसपॅन तेल गरम करा. नंतर त्यात मशरूम आणि कांदा टाका. काही वेळ ते चांगलं भाजून घ्या. नंतर त्यात स्टॉक आणि दूध टाका. त्यानंतर ते चांगलं उकळून घ्या. १० ते १५ मिनिटे शिजवा. एकदा मशरूम शिजलं आहे का ते तपासून पहा. त्यानंतर ते सूप ब्रेडस्टीक किंवा क्रोटॉनसोबत सर्व करा.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nina Kutina: गोकर्णच्या जंगलातील गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचा शोध कसा लागला? पोलिसांनी सांगितलं सत्य

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! शनिवारी १२ तास पाणीकपात; 'या' भागात पाणीपुरवठा बंद

Shravan Upvas Special 2025: श्रावणातील उपवासासाठी बनवा हटके, कुरकुरीत आणि चविष्ट केळी-साबुदाणा कटलेट

Pune Porsche Car Accident : मुलाला प्रौढ ठरवून त्याविरोधात खटला चालविण्याचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन आरोपीस दिलासा

‘सुपर डान्सर चॅप्टर-5’ मध्ये सेंसेशनल सोमांशने दाखवली चमक, आईच्या भक्कम पाठिंब्यामुळे स्वप्न साकार!

SCROLL FOR NEXT