आपल्या आजुबाजूला आपण असंख्य असे चहाप्रेमी पाहत असतो ज्यांनी वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चहा ट्राय केले आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये इराणी चहाची Irani Chai मज्जा काही औरच आहे. दूध, क्रीम, चहा असे सगळे फ्लेवर्स या चहामध्ये लागतात. त्यामुळे अनेक जण या चहाचे चाहते आहेत. विशेष म्हणजे मित्रांसोबत गप्पांची मैफील असो वा एखादी मिटींग अनेक जण इराणी चहा पित या चर्चा करत असतात. परंतु, आपण कितीही प्रयत्न केला तरीदेखील इराणी कॅफेमधील चहाची चव आपल्या घरच्या चहाला येत नाही. म्हणूनच, या इराणी चहाची सिक्रेट रेसिपी कोणती ते पाहुयात. (homemade irani chai recipe)
साहित्य -
चहा पावडर - ४ चमचे
वेलची - ३ कुटून बारीक केलेली किंवा वेलची पूड - २ लहान चमचे
फ्रेश क्रीन - १ चमचा
दालचिनी पावडर -१ चमचा
चक्रीफूल - १
दूध - २ कप
साखर - २ मोठे चमचे
पाणी - ४ कप
कंडेंस्ड मिल्क - अर्धा कप
अर्धा कप कंडेंस्ड मिल्क
कृती -
प्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात वेलची. दालचिनी, चहा पावडर आणि साखर घाला व मंद आचेवर छान उकळी येऊ द्या. त्यानंतर पातेलं अॅल्युमिनिअर फॉईलने कव्हर करा व त्यावर अन्य दुसरं झाकण ठेवा. झाकण ठेवल्यानंतर पुन्हा मंद आचेवर १५-२० मिनीटे चहा उकळू द्या.
एकीकडे चहा उकळत असताना दुसऱ्या पातेल्यात दूध घ्या व एक उकळी आणा. उकळी आल्यावर त्यात क्रिम आणि कंडेंस्ड मिल्क मिक्स करा. किंचित घट्ट होईपर्यंत मंद आचेवर हे दूध ठेवा. आता चहाचा गॅस बंद करा व चहा गाळून घ्या. चहा गाळल्यानंतर घट्ट झालेलं दूध या चहात घाला. अशा प्रकारे क्रिमी इराणी चहा तयार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.