Rujuta Diwekar’s Tips for Thick Homemade Curd sakal
फूड

Rujuta Diwekar’s Tips for Thick Homemade Curd: विरजण लावलेलं दही झालं कसं ओळखायचं? करिनाची न्यूट्रिशनिस्ट सांगते फॉर्म्युला... व्हिडिओ एकदा पाहा

How to Know if Curd is Set Properly at Home: विरजण लावलेलं दही झालंय का? ऋजुता दिवेकर सांगते चमच्याने ओळखण्याची सोपी पद्धत!

Anushka Tapshalkar

Traditional Indian Way to Make Dahi: घरच्या घरी नैसर्गिक आणि पौष्टिक अन्न घेण्याचा सल्ला नेहमीच देणाऱ्या प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी अलीकडेच आपल्या सोशल मीडियावर एक नवीन रील पोस्ट केली आहे. या रीलमध्ये त्यांनी दही कसं योग्य पद्धतीने आणि घट्ट बसवायचं याची सविस्तर माहिती दिली आहे.

इतके दिवस "स्पून टेस्ट" करत असलेल्यांना आता पुढच्या टप्प्यावर जायचं आहे, असं म्हणत ऋजुता यांनी घरच्या घरी परिपूर्ण आणि झपाट्याने लागणाऱ्या दह्यासाठी एक सोपी आणि प्रभावी पद्धत सांगितली आहे.

या पद्धतीनुसार –

  • सर्वात आधी संपूर्ण दूध घ्यावं – शक्य असल्यास म्हशीचं दूध घ्या, ज्याचं दही घट्ट लागतं.

  • दूध गरम करताना थोडंसं दूध बाजूला काढून एका छोट्या वाटीत (सिल्वर, माती किंवा सिरॅमिक) ठेवा.

  • ते दूध कोमट असतानाच त्यात घरच्या जुन्या दह्याचा थोडा "कल्चर" टाका.

  • आता हे मिश्रण ३२ वेळा ढवळा.

  • दूध स्थिर होईपर्यंत थांबा.

  • नंतर त्यावर हलकं कापड झाका. (धातूचं झाकण न वापरण्याचा सल्ला आहे)

  • हे दूध थंड आणि अंधाऱ्या जागेत ठेवा.

  • ८ ते १२ तासांनी दही लागल्यावर दुसरा संच तयार करा, आणि लगेच खाणार नसाल तर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

या दह्याचे रोज सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते, गट हेल्थ (Gut Health) बळकट होते आणि शरीरातील प्रोबायोटिक्सचा समतोल राखला जातो.

योग्य पद्धतीने विरजण लावणे का महत्त्वाचे?

दही हे दूधामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आंबवण प्रक्रियेतून तयार होते. योग्य प्रकारे आंबवल्यानंतर हे बॅक्टेरिया लॅक्टिक अ‍ॅसिड तयार करतात, ज्यामुळे दूधातील प्रथिने गोळा येऊन जेलसारखी रचना तयार होते. नीट सेट झालेल्या दह्यामध्ये जगत असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरियांची मात्रा जास्त असते, जे पाचनासाठी उपयुक्त ठरतात.

पण जर दही नीट लागलेलं नसेल, फारच पातळ वाटत असेल, तर त्यात हे चांगले बॅक्टेरिया कमी असण्याची शक्यता असते. कारण कधी कधी तापमान योग्य नसतं किंवा स्वच्छता नीट पाळली जात नाही. त्यामुळे दही नेहमी स्वच्छ, योग्य पद्धतीने आणि संयमानं लावणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT