Banana Rava Fry  sakal
फूड

Banana Rava Fry Recipe: कच्च्या केळ्यापासून काही मिनिटांत बनवा ही खास डिश, ही आहे सोपी रेसिपी

तुम्ही केळीपासून ही झटपट डिश बनवू शकता, जाणून घ्या रेसिपी...

Aishwarya Musale

पोटॅशियमचे पॉवरहाऊस असलेले केळे हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते, म्हणून प्रत्येकाला त्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रत्येक वेळी ते त्याच पद्धतीने खाल्ले पाहिजे असे नाही. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते फक्त एकाच प्रकारे नाही तर अनेक प्रकारे खाऊ शकता आणि स्वादिष्ट स्नॅक्स तयार करू शकता.

केळीची चटणी तुम्ही नक्कीच खाल्ली असेल, पण तुम्ही केळीच्या क्रिस्पी स्टिकचा आस्वाद घेतला आहे का? नसेल तर एकदा नक्की बघा. रवा आणि केळीचे स्नॅक्स बनवायला सोपे आहे. तुम्हाला ते प्रत्येक वीकेंडला करायला आवडेल. म्हणून आज आम्ही तुमच्यासोबत घरी बनवण्याची सोपी रेसिपी शेअर करत आहोत.

लागणारे साहित्य

केळी - ४ (चिरलेली)

चाट मसाला- 1 टीस्पून

काळी मिरी पावडर - 1 टीस्पून

मीठ - चवीनुसार

तेल- तळण्यासाठी

रवा - १ कप

ब्रेडचे तुकडे- २ चमचे

बनवण्याची पद्धत

सर्व प्रथम, केळी सोलून त्याचे त्याचे लांब लांब तुकडे करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही केळीचेही गोल गोल कापून घेऊ शकता.

केळी कापल्यानंतर उन्हात वाळवायला ठेवा आणि सुकल्यावर एका भांड्यात रवा टाका.

नंतर त्यात मीठ, मिरपूड, तिखट आणि पाणी घालून पीठ तयार करा. आता कढईत तेल गरम करायला ठेवा.

तेल गरम झाल्यावर केळीचे तुकडे पिठात टाका आणि नंतर ब्रेड क्रंबमध्ये मिक्स करून हलके तळून घ्या.

कुरकुरीत झाल्यावर ताटात काढून वर चाट मसाला टाका आणि चहासोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT