Cabbage Paratha Recipe esakal
फूड

Cabbage Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा स्वादिष्ट कोबी पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

Cabbage Paratha Recipe : कोबीमध्ये पोषकघटकांचे आणि कॅल्शिअमचे विपुल प्रमाण आढळून येते.

Monika Lonkar –Kumbhar

Cabbage Paratha Recipe : उन्हाळ्यात मार्केटमध्ये अनेक प्रकारची फळे आणि पालेभाज्या मिळतात. कोबी ही एक अशी फळभाजी आहे की, जी वर्षभर मार्केटमध्ये मिळते. परंतु, अनेकांना कोबीची भाजी खायला आवडत नाही. या कोबीमध्ये पोषकघटकांचे आणि कॅल्शिअमचे विपुल प्रमाण आढळून येते. जर कोबीची भाजी खायला घरातील लोक टाळाटाळ करत असतील तर तुम्ही कोबीचा स्वादिष्ट पराठा बनवू शकता.

हा पराठा खायला अतिशय चवदार लागतो. आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या कोबीचा पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये नक्कीच बनवू शकता. हा पराठा बनवण्यासाठी फार साहित्याची गरज पडत नाही. शिवाय, हा पराठा बनवायला अतिशय सोपा आहे. या पराठ्यासाठी तुम्ही कच्चा किंवा वाफवलेला कोबी देखील वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊयात स्वादिष्ट कोबी पराठा बनवण्याची सोपी पद्धत.

कोबी पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • किसलेला कोबी १ वाटी

  • २ वाटी कणीक

  • किसलेले गाजर १ वाटी

  • अर्धी वाटी शिमला मिरची

  • अर्धी वाटी इतर भाज्या (तुमच्या आवडीनुसार)

  • १ चमचा लाल तिखट

  • चिमूटभर हळद

  • चवीनुसार मीठ

  • दही १ कप

  • हिरवी मिरची चिरलेली

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

कोबी पराठा बनवण्याची सोपी पद्धत

  • कोबी पराठा बनवण्याठी सर्वात आधी कोबी बारीक चिरून घ्या.

  • त्यानंतर, कोबी धुवून घ्या. आता या कोबीमध्ये चिमूटभर मीठ घालून कोबी जरावेळ बाजूला ठेवा.

  • त्यानंतर, या कोबीमध्ये कणीक मिसळा.

  • ही कणीक मिसळून घेताना त्यामध्ये लाल तिखट, दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ मिसळा.

  • हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घेण्यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करा.

  • आता एका बाजूला गॅसवर तवा गरम करायला ठेवा.

  • त्यानंतर, या पीठाचे गोळे बनवून घ्या आणि पराठा लाटायला घ्या.

  • तवा गरम झाल्यावर यामध्ये तेल किंवा तूप पसरून घ्या आणि पराठा भाजून घ्या.

  • दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत पराठा छान भाजून घ्या.

  • त्यानंतर, दही, टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT